शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी लाभार्थी निवड गुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:11 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या उपकरातून विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीतून पात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.

अकोला: जिल्हा परिषदेच्या उपकरातून विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीतून पात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गुरुवारी लकी ड्रा पद्धतीने लाभार्थी निवड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कृषी विभागाकडे असलेल्या ५७ लाख ५० हजारांच्या निधीतून लाभ मिळण्यासाठी तब्बल ४,२७३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही संख्या प्रचंड असल्याने लाभार्थी निवडीसाठी लकी ड्रा काढला जाणार आहे. त्याचवेळी इतर विभागाच्या योजनांसाठी आवश्यक तेवढे अर्ज प्राप्त नसल्याचीही माहिती आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया आणि वेळापत्रकही ठरवून त्यानुसार प्रशासकीय स्तरावर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागांसह पंचायत समित्यांना दिले. त्यानुसार लाभार्थींकडून अर्ज मागवण्यात आले. ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर सर्वच विभागातील योजनांचे अर्ज स्वीकारण्यात आले. पात्र, अपात्र अर्जांची यादी तयार झाली. त्यापैकी पात्र अर्जांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून विविध विभागाच्या योजनांसाठी निधी देण्यात आला. त्यातून योजना राबवल्या जाणार आहेत. पात्र लाभार्थींची तालुकानिहाय संख्यात्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या शिलाई मशीनसाठी अकोला-१५३, अकोट-७०, तेल्हारा-४५, बाळापूर-७०, पातूर-४४, बार्शीटाकळी-७२, मूर्तिजापूर-१०४, शेळीगटासाठी अकोला-१०६, तेल्हारा-१३३, पातूर-१६, बार्शीटाकळी-११, बाळापूर-६, अकोट-३४, मूर्तिजापूर-२८ अर्ज पात्र ठरले आहेत. गोठा बांधणीसाठी तेल्हारा-२, मूर्तिजापूर-५, बाळापूर-२, अकोट-२०, अकोला-९ पात्र ठरले. बोकूड वाटपासाठी अकोट-१, बाळापूर-२, तेल्हारा-१, अकोला-३ अर्ज पात्र ठरले आहेत.कृषी विभागाच्या योजनांसाठी गर्दीकृषी विभागाकडे शेतीपयोगी साहित्य वाटपाच्या योजना आहेत. त्या योजनांसाठी अर्ज करणारांची गर्दी झाली आहे. त्यामध्ये डीझल पंप पाच एचपीसाठी २६४, ओपनवेल सबमर्सिबल पंप-५५९, पाच एचपी सबमर्सिबल-१८७, प्लास्टिक ताडपत्री-३६८, प्लास्टिक ताडपत्री-१८९९, एचडीपीई पाईप-६५२, स्पायरल सेपरेटर-३४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून निवड करण्यासाठी लकी ड्रा काढला जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद