अकोला: तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्याचा निश्चय आधी करा आणि त्यानंतर त्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवा. जग खूप विस्तारते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. पण, केवळ पुस् तकी ज्ञानावर अवलंबून न राहता ते ज्ञान प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी अंमलात आणता आले, तरच स्पध्रेच्या युगात टिकाव धरता येईल. त्यामुळे प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रमांची आणि तशाच शैक्षणिक संस्थांची निवड करा, असे प्रतिपादन शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले. प्रमिलाताई ओक हॉल, अकोला येथे विद्यार्थी व पालकांसाठी लोकमत आणि मुंबई येथील नर्सी मोन्जी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडी यांच्यातर्फे बुधवारी आयोजित लोकमत उडान या करिअर व्याख्यानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मानव स्कूल ऑफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रदीप खांदवे यांनी यावेळी विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती दिली. प्रवेशासाठी लागणारी विविध कागदपत्रे, शिष्यवृत्ती व प्रवेशप्रक्रियेदरम्यान होणार्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान कसे होते, या विषयावर पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी असिस्टंट प्रोफेसर निर्मल ठाकूर, शशिकांत बगाडे यांनी फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी, गिरीष पाटील यांनी हवाई वाहतुकीमध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींची माहिती दिली. चर्चासत्रानंतर उपस्थित पालकांनी व विद्यार्थ्यांनी वक्त्यांना शैक्षणिक प्रश्न विचारून शंकांचे समाधन करून घेतले, इंजिनिअरिंग, फार्मसी, हवाई वाहतूकसंदर्भात मिळालेल्या उपयुक्त माहितीसाठी उपस्थिती पालकांनी व विद्यार्थ्यांनी लोकमत -नर्सी मोन्जी इन्स्टिट्युटचे आभार मानले. याप्रसंगी २0 भाग्यवान विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ मार्फत पेन ड्राईव्ह वाटप करण्यात आले. संचालन व आभार प्रदर्शन योगेश पाटील यांनी केले.
करिअर ओरिएंटेड अभ्यासक्रम निवडा
By admin | Updated: April 17, 2015 01:51 IST