शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दुसरी पत्नी, तिच्या मित्राकडून पतीला लोखंडी पाईपने मारहाण

By admin | Updated: May 24, 2017 01:39 IST

अपत्य होत नसल्याने पहिल्या पत्नीच्या संमतीने केला दुसरा विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खडकी येथील रहिवासी इसमाची दुसरी पत्नी व तिच्या मित्राने पतीला मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी विद्युत भवन परिसरात घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी सदर इसमाच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.खडकी परिसरातील सौदामिनी वसाहत येथील रहिवासी इसमाचे एका युवतीशी लग्न झाले होते; मात्र या दाम्पत्याला मूलबाळ होत नसल्याने उभयतांनी एकमेकांच्या संमतीने २०१३ मध्ये दूसऱ्या विवाहाला मान्यता दिली. त्यामुळे या इसमाने दुसरा विवाह केला. दूसऱ्या विवाहानंतर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. या वादातून त्यांची दुसरी पत्नी ही वाद झाल्यानंतर दोन ते तीन दिवस घर सोडून जात होती. त्यानंतर ती परत येत होती. अशातच दूसऱ्या पत्नीला एक मुलगी झाली. या मुलीला सोडूनही ती प्रत्येक वेळी घर सोडून जात होती. या प्रकारामुळे सदर इसम व दूसऱ्या पत्नीमध्ये वाद वाढल्याने दूसऱ्या पत्नीने पतीविरोधात खदान पोलीस स्टेशनला मारहाणीची तक्रार दिली होती; दरम्यान दूसरी पत्नी आणि तिचा मित्र हे दोघे मंगळवारी दुचाकीवरून विद्युत भवनासमोरून जात असताना असताना पतीला दिसले. पतीने दूसऱ्या पत्नीच्या मित्राचे घर गाठून पत्नीला घरी परत चलण्याची विनंती केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर त्याची दूसरी पत्नी आणि तिचा मित्र या दोघांनी संगनमताने तिच्या पतीला लोखंडी पाइपने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पतीने तत्काळ रामदासपेठ पोलीस स्टेशनला दुसरी पत्नी व तिचा मित्र याच्याविरोधात तक्रार केली. यावरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रामदासपेठ पोलिस पुढील तपास करीत आहेत.