शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारतींना नियमानुकूल करण्यासाठी दुसऱ्यांदा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

शहरात बांधकाम व्यावसायिकांनी मंजूर ‘एफएसआय’पेक्षा तब्बल तीनपट, चारपट जास्त अनधिकृत बांधकाम केल्यामुळे १८७ इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आजही कायम ...

शहरात बांधकाम व्यावसायिकांनी मंजूर ‘एफएसआय’पेक्षा तब्बल तीनपट, चारपट जास्त अनधिकृत बांधकाम केल्यामुळे १८७ इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आजही कायम आहे. मागील सात वर्षांपासून अनधिकृत इमारतींच्या संदर्भात मनपा प्रशासनासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ठाेस ताेडगा न काढता जाणीवपूर्वक हा तिढा प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे संबंधीत बांधकाम व्यावसायिक तसेच मालमत्ताधारकांना अनेकदा नाेटीस जारी केल्या जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. नियमापेक्षा जास्त बांधकाम करणाऱ्यांमध्ये इतर व्यावसायिकांप्रमाणेच काही खासगी शिकवणी संचालकांचाही समावेश आहे. मध्यंतरी याप्रकरणी प्रशासनाने ठाेस निर्णय घेण्याचा मुद्दा ‘लाेकमत’ने लावून धरला हाेता. प्रशासनाकडून वारंवार नाेटीस दिली जात असल्याने अकाेलेकरांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आयुक्तांना सर्वाधिकार पण...

बिल्डरांनी किंवा मालमत्ताधारकांनी नियमापेक्षा जास्त बांधकाम केले असेल तर संबंधितांना तीन पट, चारपट दंड व टॅक्सच्या रकमेत शास्तीची आकारणी करून त्याला पुढील बांधकाम करण्यास कायमस्वरूपी मज्जाव घालण्याच्या कारवाईची गरज आहे. अनधिकृत बांधकामासंदर्भात मनपा आयुक्तांना सर्वाधिकार आहेत. परंतु हा तिढा कायम राहावा, यासाठी काही राजकीय पदाधिकारी जाणीवपूर्वक प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येते.

‘युनिफाईड डीसीआर’चा वापर का नाही ?

राज्य शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या उद्देशातून ‘युनिफाईड डीसीआर’लागू केला. इमारतींचे नियमापेक्षा जास्त बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांसह मालमत्ताधारकांच्या प्रकरणांवर ताेडगा काढण्यासाठी प्रशासनाने सुधारित ‘डीसीआर’चा वापर करण्याची गरज आहे. येत्या ९ जून राेजीच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवक व प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.