शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

अकोला जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे लसीकरण केवळ २० टक्केच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 10:19 IST

Corona Vaccination : वारंवार लसीचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा फटका दुसऱ्या डोसच्या लसीकरणावर दिसून येत आहे.

ठळक मुद्देउद्दिष्टाच्या केवळ ४३ टक्केच लसीकरणलसीच्या तुटवड्याचा मोहिमेला फटका

- प्रवीण खेते

अकोला : जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ४३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, मात्र  वारंवार लसीचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा फटका दुसऱ्या डोसच्या लसीकरणावर दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दुसऱ्या डाेसचे सुमारे २० टक्केच लसीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास लाभार्थ्यांना पहिला डोस सहज मिळून जाईल, मात्र दुसऱ्या डोससाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ६ लाख ५ हजार ३७६ लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार जानेवारी महिन्यात मोठ्या उत्साहात कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला वैद्यकीय कर्मचारी व इतर फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी या माेहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरुवात होतच जिल्ह्यातील कोविड लसीकरण मोहिमेला गती मिळाली. त्या पाठोपाठ ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणास सुरुवात झाली. मोहिमेंतर्गत ७८ हजार ६३३ ज्येष्ठांनी, तर ४५ वर्षांवरील वयोगटातील ८५ हजार १५७ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला, मात्र दुसऱ्या डोसची संथ असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ २६ हजार १३५ ज्येष्ठांनी, तर ४५ वर्षांवरील २० हजार ५२६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दुसऱ्या डोससाठी लाभार्थ्यांना लसच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

अशी आहे लसीकरणाची स्थिती

उद्दिष्ट - ६,०५,३७६ (४३ टक्के)

 

झालेले लसीकरण

वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस

ज्येष्ठ - ७८,६३३ (४०टक्के) - २६१३५ (१३ टक्के)

४५ ते ६० - ८५१५७ (२१ टक्के) - २०५२६ (५ टक्के)

(१८ ते ४५ - १७,३०५)

 

१ लाख १७ हजार लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

जिल्ह्यात एकूण लसीकरणाच्या सुमारे २० टक्केच लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले. त्यामुळे अद्यापही सुमारे १ लाख १७ हजार १२९ लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा कायम आहे. यामध्ये ५२,४९८, ज्येष्ठ, तर ४५ वर्षांवरील ६४ हजार ६३१ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCorona vaccineकोरोनाची लस