शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध; आशा, अंगणवाडीसेविकांच्या गृहभेटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 13:33 IST

अकोला : तीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणेसाठी असलेला निधी खर्च करण्याचे अधिकार गावपातळीवर अंगणवाडीसेविकांना दिले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवण्यात आली आहे.

ठळक मुद्दे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाने ही बाब गांभीर्याने घेत उपाययोजनांची सुरुवात केली. गृहभेटीतून प्रत्येक बालकाचे वजन, उंची, दंडघेर, आरोग्यविषयक तक्रारींची माहिती घेण्यात आली. आहार व औषधीचा खर्च भागवण्यासाठी अंगणवाडी स्तरावरच व्हीसीडीसीचा निधी दिला जाणार आहे.

अकोला : तीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणेसाठी असलेला निधी खर्च करण्याचे अधिकार गावपातळीवर अंगणवाडीसेविकांना दिले जाणार आहेत. त्यासाठी अकोला जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवण्यात आली आहे. त्यांना ग्राम बालविकास केंद्रात आहार व औषधोपचार दिला जाणार आहे.  पावसाळ््यात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. काही प्रमाणात बालमृत्यूही वाढतात. ही बाब आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासाठी आव्हानात्मक ठरते. त्यातच जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची चर्चा दरम्यानच्या काळात झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाने ही बाब गांभीर्याने घेत उपाययोजनांची सुरुवात केली. राजमाता जिजाऊ मिशन अंतर्गत आरोग्य विभागाने नुकतेच आशा, अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षण दिले. त्यानुसार जिल्ह्यात कुपोषित बालकांचा नव्याने शोध घेण्याचे बजावण्यात आले. गृहभेटीतून प्रत्येक बालकाचे वजन, उंची, दंडघेर, आरोग्यविषयक तक्रारींची माहिती घेण्यात आली. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार गावपातळीवर ग्राम बालविकास केंद्र निश्चित केले जाईल. त्या केंद्रात तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांवर उपचार केले जातील. आहार व औषधीचा खर्च भागवण्यासाठी अंगणवाडी स्तरावरच व्हीसीडीसीचा निधी दिला जाणार आहे. अंगणवाडीसेविकांना तो खर्च करण्याचे अधिकारही देण्यात येतील. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या निश्चित झाली आहे. किती गावांमध्ये ग्रामबालविकास केंद्र सुरू होतील, याचे नियोजन सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त उद्या जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

 जिल्हा स्त्री रुग्णालयातही कक्ष सुरूजिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांवर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातही बालविकास केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी माता व बालकांना पोषक आहार देणे, वजन वाढवणे, आरोग्य सुधारणेसाठी औषधोपचार केले जातात. आता गावपातळीवरच औषध आणि आहाराचा निधी दिला जाणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद