शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: September 24, 2016 03:12 IST

राज्य निवडणूक आयोगाने दिली मान्यता.

अकोला, दि. २३- महापालिकेच्या बहुसदस्यीय प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, १0 ऑक्टोबर रोजी पुनर्रचनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. यंदा प्रथमच एका प्रभागातून चार नगरसेवकांना निवडून द्यावे लागणार असल्याने अकोलेकरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडणारी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार पार पडेल. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपाच्या स्तरावर प्रभागांची रचना करण्यात आली. यामध्ये जास्तीत जास्त २९ हजार ५४३ तर कमीत कमी २४ हजार लोकसंख्येचा निकष ठेवण्यात आला. प्रभाग पुनर्रचनेची ही जबाबदारी आयुक्त अजय लहाने यांनी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सोपविली होती. मध्यंतरी निवडणूक आयोगाचे अधिकारी अतुल जाधव यांनी गूगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना करण्यासंदर्भात प्रशासनाला मार्गदर्शन केले होते. प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर विभागीय आयुक्तांनी स्वाक्षरी केल्यानंतर सदर अहवाल अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. या अहवालावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.असे राहील वेळापत्रक

प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे- १0 ऑक्टोबरप्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे- १0 ते २५ ऑक्टोबरप्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी- ४ नोव्हेंबरहरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे सादर करणे- १0 नोव्हेंबरप्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून निर्णय देणे -२२ नोव्हेंबरप्रभाग रचनेची अधिसूचना व नकाशात योग्य तो बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करणे- २५ नोव्हेंबर.ऑक्टोबरमध्ये हरकती- सूचनाप्रभाग पुनर्रचनेच्या अहवालाला निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार १0 ऑक्टोबर रोजी नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला जाईल. त्यावर निवडणूक आयोगामार्फत सुनावणी होऊन हरकती व सूचना निकाली काढल्या जातील. आधी आरक्षणाची सोडत नंतर..अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचे आरक्षण निश्‍चित झाले आहे. ओबीसी महिला, पुरुष प्रवर्गाच्या आरक्षण सोडतची नोटीस ४ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करून ७ ऑक्टोबरला सोडत काढली जाईल. त्यानंतर १0 ऑक्टोबरला प्रभाग पुनर्रचनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल. यापूर्वी पार पडलेल्या मनपा निवडणुकीत आरक्षणाची सोडत व प्रभाग पुनर्रचनेचा अहवाल एकाच दिवशी प्रसिद्ध केला जात असे, हे येथे उल्लेखनीय.