शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

विज्ञानमंचची परिक्षा २० आॅगस्टला

By atul.jaiswal | Updated: August 18, 2017 13:58 IST

अकोला : विज्ञानमंच ही योजना विज्ञान शिक्षणाची आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पूर्व तयारी करीता सहाय्यभूत योजना आहे. जिल्ह्यातील विखुरलेले प्रज्ञावंत विद्यार्थी एकत्र करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दीवंत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद अकोला यांच्या विद्यमाने जिल्हा विज्ञानमंच प्रवेश परिक्षेचे आयोजन जिल्ह्यातील ज्युबिली इंग्लीश ...

अकोला : विज्ञानमंच ही योजना विज्ञान शिक्षणाची आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पूर्व तयारी करीता सहाय्यभूत योजना आहे. जिल्ह्यातील विखुरलेले प्रज्ञावंत विद्यार्थी एकत्र करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दीवंत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद अकोला यांच्या विद्यमाने जिल्हा विज्ञानमंच प्रवेश परिक्षेचे आयोजन जिल्ह्यातील ज्युबिली इंग्लीश हायस्कूल रामदारपेठ पोलिस स्टेशन जवळ अकोला आणि बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर तालुके या केंद्रावर तर श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट या केंद्रावर तेल्हारा व अकोट तालुक्यातील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.विज्ञानमंच प्रवेशचाचणी परीक्षेची प्रश्नपत्रीका मराठी व इंग्रजी माध्यमातून राहिल. ही प्रश्नपत्रिका मानसिक क्षमता कसोटी व शालेय प्राविण्यता कसोटी अशा दोन भागात विभागली आहे. यासाठी एकूण २० गुणांचे २० वस्तूनिष्ठ प्रश्न विचारले आहे. शालेय प्राविण्यता कसोटीमध्ये गणितासाठी १५ गुणांचे १५ वस्तुनिष्ठ प्रश्न व सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र) या विषयावर आधारित ४५ गुणांचे ४५ प्रश्न वस्तूनिष्ठ प्रश्न इंग्रजीसाठी १०गुणांचे १० प्रश्न आणी सामान्य ज्ञान १० गुणांचे १० प्रश्न असे शंभर गुण- शंभर प्रश्न असतील. परिक्षेतून निवडप्राप्त शहरी भागातील ३० आणि ग्रामीण भागातील ४० विद्यार्थी असे एकूण ७० विद्यार्थ्याचे ७ दिवसाचे निवासी निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिवाळीच्या सुट्टित किं वा दीर्घ सुट्टीत आ़योजित करण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, देवेंद्र अवचार,दिनेश तरोळे, अरूण शेगांवकर, रविंद्र भास्कर, अनिल जोशी, विश्वास जढाळ, अनिल मसने, सुनिल वावगे, एस.बी.जाधव, गजानन निमकर्डे, व्ही.डी.देवके, विलास, घुंगड यांनी केले आहे.