शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सायन्स एक्स्प्रेस : रेल्वे सल्लागार समितीचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:39 IST

अकोला: देशभ्रमंतीवर निघालेल्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ला अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्यासाठी मध्य रेल्वे सल्लागार समितीने पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: देशभ्रमंतीवर निघालेल्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ला अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्यासाठी मध्य रेल्वे सल्लागार समितीने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात लवकरच मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समितीचे सदस्य बसंतकुमार बाछुका यांनी ‘लोकमत’ला दिली. चालते-फिरते वैज्ञानिक प्रदर्शन घेऊन देशभ्रमंतीवर निघालेली ‘सायन्स एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल झाली आहे. थांबा देण्यात आलेल्या देशभरातील प्रमुख रेल्वेस्थानकांच्या यादीमध्ये राज्यातील रत्नागिरी, मुंबई, नाशिक रोड, मूर्तिजापूर व नागपूर या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. या वैज्ञानिक रथातील प्रदर्शन पाहण्यासाठी उत्सुक रायगड जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांच्या आग्रहास्तव या गाडीला ‘लोकमत’च्या माध्यमातून रोहा या रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले होते. ‘सायन्स एक्स्प्रेस’च्या १६ वातानुकूलित डब्यांमध्ये भरविण्यात आलेले वैज्ञानिक प्रदर्शन पाहण्याकरिता अकोल्यासह बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक उत्सुक आहेत. रोह्याप्रमाणेच या गाडीला अकोला रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी तिन्ही जिल्ह्यातील जनसामान्यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून उचलून धरली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात लवकरच समितीचे सदस्य मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती बसंतकुमार बाछुका यांनी ‘लोकमत’ला दिली. राष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेनिमित्त दिल्ली येथे मुक्कामी असलेले खासदार संजय धोत्रे यांनीसुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे हा प्रस्ताव सादर करणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे बाछुका यांनी बोलताना स्पष्ट केले. तर पश्चिम वैदर्भीयांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी कसोशीने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही ‘विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स’ व रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.