शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही राहणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:00 IST

शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरुवातीला शहरातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता; परंतु शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १६ मार्च रोजी ग्रामीण भागातील सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, खबरदारी म्हणून आणि कोरोनाचा आजार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाने शनिवारी राज्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला होता; परंतु यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता. त्यामुळे शिक्षक, शिक्षक संघटना, शिक्षण संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि कोरोनाचा धोका ग्रामीण भागाला नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शहरांमधील शाळांमध्येच विद्यार्थ्यांची गर्दी होत नाही तर ग्रामीण भागातील शाळांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असल्याने, ग्रामीण भागातसुद्धा शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले. १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीसुद्धा आदेश काढत, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यास बजावले आहे. या निर्देशाची अवहेलना केल्यास, भादंवि कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.

शिक्षकांना ड्युटी, शिक्षक संघटनांची नाराजीकोरोनाबाबत खबरदारी घेण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे; परंतु शिक्षकांना सुट्टी न दिल्यामुळे, त्यांना शाळेत जाऊन ड्युटी करावी लागत आहे. याबाबत शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी, शिक्षकांनी शाळेत जाऊन त्यांची इतर शैक्षणिक कामे करण्यास म्हटले आहे; परंतु या निर्णयाबाबत शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत, शिक्षक माणसे नाहीत का, त्यांना कोरोना विषाणूपासून बाधा होणार नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्याचे प्रमुख काम आहे; परंतु विद्यार्थीच शाळेत नाहीत तर शिक्षकांनी शाळेत जाऊन काय करायचे? त्यामुळे शिक्षकांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्ठी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस