शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थी घेणार शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:40 IST

अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण  होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने मंगळवारी १0 ऑक्टोबर रोजी सकाळी १0.१५ वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देशिक्षण संचालकांचे शिक्षणाधिकार्‍यांना पत्र शाळांमध्ये उपक्रम घेण्याचा आदेश

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण  होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने मंगळवारी १0 ऑक्टोबर रोजी सकाळी १0.१५ वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे. देशभरामध्ये दिवाळीचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीमध्ये आवाजी फटाके खरेदी करण्यासाठी मुले आणि युवकांचा अधिक आग्रह असतो. आवाजी व धूरयुक्त फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे दम्याचे, फुप्फुसाचे, श्‍वसनाचे आजार होतात.  हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर जनजागृती करून विद्यार्थ्यांचे आवाजी फटाक्यांची आतषबाजी टाळण्यासाठी मन परिवर्तन व्हावे या उद्देशाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्याचा निर्णय पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येऊन, त्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकत्रितपणे शपथ घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आदेशानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी  शिक्षणाधिकार्‍यांनासुद्धा पत्र पाठवून सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. 

शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात शालेय विद्यार्थ्यांना मंगळवारी शपथ दिली जाणार आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून उपक्रम घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. -प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, अकोला