शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थी घेणार शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 13:52 IST

नितीन गव्हाळे ।अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व ...

ठळक मुद्देशिक्षण संचालकांचे शिक्षणाधिकाºयांना पत्र शाळांमध्ये उपक्रम घेण्याचा आदेश

नितीन गव्हाळे ।अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने मंगळवारी १0 आॅक्टोबर रोजी सकाळी १0.१५ वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे.देशभरामध्ये दिवाळीचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीमध्ये आवाजी फटाके खरेदी करण्यासाठी मुले आणि युवकांचा अधिक आग्रह असतो. आवाजी व धूरयुक्त फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे दम्याचे, फुप्फुसाचे, श्वसनाचे आजार होतात. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर जनजागृती करून विद्यार्थ्यांचे आवाजी फटाक्यांची आतषबाजी टाळण्यासाठी मन परिवर्तन व्हावे या उद्देशाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्याचा निर्णय पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येऊन, त्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे.राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकत्रितपणे शपथ घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आदेशानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी शिक्षणाधिकाºयांनासुद्धा पत्र पाठवून सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत.