शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार!

By admin | Updated: September 1, 2016 02:44 IST

खेट्रीच्या जि.प. शाळेतील प्रकार; समायोजन न केल्याने पालक संतप्त.

खेट्री(जि. अकोला),दि. ३१ : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत सहा शिक्षकांपैकी एका शिक्षकाचे समायोजन करण्यात आल्याने संतप्त झालेल्या पालकांनी २९ व ३0 ऑगस्ट रोजी शाळेवर बहिष्कार टाकून मुलांना शाळेत पाठविले नाही. संबंधितांकडे सदर शिक्षकाचे समायोजन रद्द करा, असे निवेदन सादर करूनही समायोजन रद्द न केल्याने पालकांनी मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले शाळेतून काढण्याचा निर्णय घेऊन शाळेत धाव घेतल्याचा खळबळजनक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी घडला.खेट्रीच्या जि.प.शाळेत सहा शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस कमी होत चाललेली पटसंख्या पाहता शिक्षण विभागाने तालुक्यातील शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत खेट्रीच्या जि.प.शाळेतील गजानन विश्‍वनाथआप्पा हिंगमिरे या शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. त्यानुसार मुख्याध्यापिकेने सदर शिक्षकाला कार्यमुक्त केले. या घटनेची माहिती गावकर्‍यांना होताच गावात खळबळ उडाली. परिणामी, या शाळेत मुले शिकत असलेल्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर संबंधितांकडे सदर समायोजन रद्द करा, असे निवेदन सादर केले; परंतु संबंधितांना समायोजन रद्द न केल्यामुळे गावातील अनिल ताले, दगडू ताले, सुधाकर तिडके, शंकर आढोळे, भानुदास सगळगिळे, राजू मोरे आदी संतप्त पालकांनी ३१ ऑगस्ट रोजी शाळेत धाव घेऊन शाळेतील मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले काढण्याचे ठरविले; परंतु मुख्याध्यापिका केंद्राची मिटिंग असल्यामुळे शाळेत उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या पालकांना त्यांच्या पाल्यांचे शाळा सोडल्याचे दाखले मिळू शकले नाहीत. या शाळेतील पहिल्या ते सातव्या ७ वर्गापर्यंत जवळपास १00 विद्यार्थी शिकत आहेत. शाळेतील सात वर्गांतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फक्त पाचच शिक्षक असल्यामुळे पालक संताप व्यक्त करीत आहेत. सदर शिक्षकाचे समायोजन रद्द न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी निवेदनात वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला आहे.