शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:31 IST

अकोला : जिल्हय़ातील  ६९२ पाणीपुरवठा योजनांनी महावितरणचे तब्बल सात कोटी रुपये थकविले असून, ही रक्कम वसूल होत नसल्याचे पाहून महावितरणने आता या योजनांना वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. ठरावीक मुदतीत थकबाकीची रक्कम भरली नाही, तर वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराच महावितरणने नोटीसद्वारे दिल्यामुळे या पाणीपुरवठा योजना वांध्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे६९२ योजनांनी थकविले सात कोटी महावितरण करणार वीज पुरवठा खंडित

अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील  ६९२ पाणीपुरवठा योजनांनी महावितरणचे तब्बल सात कोटी रुपये थकविले असून, ही रक्कम वसूल होत नसल्याचे पाहून महावितरणने आता या योजनांना वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. ठरावीक मुदतीत थकबाकीची रक्कम भरली नाही, तर वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराच महावितरणने नोटीसद्वारे दिल्यामुळे या पाणीपुरवठा योजना वांध्यात आल्या आहेत.महावितरणचा घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजनांकडील थकबाकीही मोठी आहे. वीज देयकांची वसुली करताना मात्र महावितरणच्या नाकीनऊ येत आहेत. आता मात्र महावितरण थकबाकी वसुलीसाठी सरसावली असून, वीज देयक न भरणार्‍यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे धोरण अवलंबिले आहे. जिल्हय़ातील एकूण पाणीपुरवठा योजनांपैकी ६९२ पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची ७ कोटी ३ लाख २५ हजार ७९८ रुपयांची थकबाकी असून, ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील असलेल्या पाणीपुरवठा योजनांनी वीज वापरापोटीची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकविली आहे. शासनाच्या अंगीकृत असल्यामुळे महावितरणने या योजनांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी मुदत वाढवून दिली, तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्याने भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली; परंतु पाणीपुरवठा योजनांकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर महावितरणने या योजनांना नोटीस जारी करून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. 

नोटीस बजावल्यापाणीपुरवठा योजनांकडील थकबाकी वसूल व्हावी, यासाठी महावितरणने त्यांना ही रक्कम टप्प्या-टप्प्याने भरण्याची मुभा दिली होती. यानुसार एकूण रकमेच्या २0 टक्क्यांचा एक, असे पाच हप्ते पाडून थकबाकी भरण्याची सुविधा महावितरणने दिली; परंतु योजनांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महावितरणने या योजनांना नोटीस बजावल्या आहेत. 

पाणीपुरवठा योजनांनी थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, यासाठी त्यांना विनंती केली; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. थकबाकी न भरणार्‍या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा नियमाप्रमाणे खंडित करण्यात येईल. - दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण.-