शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईसदृश गावांमध्ये सवलतींची अंमलबजावणी अधांतरी

By admin | Updated: May 28, 2014 22:13 IST

गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

अकोला : गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. आठवडा उलटून गेला तरी, टंचाईसदृश गावांना द्यावयाच्या सवलतीबाबत संबंधित यंत्रणांकडून अद्याप कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे टंचाईसदृश गावांना सवलती देण्याच्या निर्णयाची स्थिती अधांतरी आहे.शासनाच्या गत ३० एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गेल्या १९ मे रोजी काढला. टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे रुपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर आणि शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, अशा विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून, अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), जिल्हा कृषी विकास अधिकारी, प्राथामिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व इतर सर्वच संबंधित विभाग आणि यंत्रणांच्या अधिकार्‍यांना आदेशात दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर आठवडा उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांमध्ये द्यावयाच्या सवलतीसंदर्भात संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही, किंवा तसा अहवाल अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांमध्ये द्यावयाच्या विविध सवलतींबाबतचा निर्णय अंमलबजावणीविना अधांतरी असल्याचे चित्र आहे.