शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 13:50 IST

अकोला: सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) अंतर्गत तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प पडली असून, गेल्या पाच दिवसांपासून धनादेश वटविल्या न गेल्याने कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबली आहे.

- संजय खांडेकर

अकोला: सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) अंतर्गत तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प पडली असून, गेल्या पाच दिवसांपासून धनादेश वटविल्या न गेल्याने कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबली आहे. तांत्रिक बदल बँकेचा असला तरी धनादेश न वटविल्या गेल्याच्या कारवाईचा भुर्दंड मात्र तांत्रिकदृष्ट्या ग्राहकांनाच सोसावा लागणार आहे.रिझर्व बँकेच्या निर्देशान्वये १५ सप्टेंबर १८ पासून धनादेश वटविण्यासाठी सीएसटी पद्धत लागू झाली. प्रत्येक बँकेत येणारे धनादेश स्कॅन केले जातात. सत्यतेची शहानिशा झाल्यानंतर तो धनादेश अल्ट्रा व्हायलेट मशीनमध्ये तपासून स्कॅन झालेली ई-मेज इंटरनेटद्वारे वटविण्याची पाठविली जाते. धनादेश आणि सोबतची बँक स्लीप दोन्ही ई-मेजची सत्यता पडताळणी झाल्यानंतरच तो धनादेश वटविला जातो. या पद्धतीने कामकाज सप्टेंबरपासून सुरू झाले. दरम्यान, फेब्रुवारीत आरबीआयने यंत्रणेत अंतर्गत तांत्रिक बदल केले. हा बदल स्वीकारण्यासोबतच भारतीय स्टेट बँकेत असलेला लोड क्षमतेबाहेर गेल्याने, स्टेट बँकेचे शेकडो धनादेश पाच दिवस वटविल्या गेले नाही. धनादेश वटविल्या न गेल्याने ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. तांत्रिक कारणांमुळे धनादेश वटविल्या जाणार नाही, अशी स्पष्ट नोटीस बँकांमध्ये लावल्या गेली. कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबल्याने ग्राहक त्रासले. सोबतच धनादेश अनादर झाल्याच्या कारवाईचा फटकादेखील आता ग्राहकांना सोसावा लागत असल्याने ग्राहक संतापले आहेत. ही समस्या केवळ अकोल्यापुरता मर्यादित नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.- रिझर्व बँक आॅफ इंडियाने सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) सेवा अलीकडेच एनसीआर कंपनीला दिली. स्वॉफ्टवेअर बदलल्या गेल्याने आणि सोबतच सर्व्हर डाउनची समस्या असल्याने काही दिवस ही समस्या कायम होती; मात्र आता धनादेश वटविले जात आहेत. दररोज अकोल्यात ८०० धनादेश वटविण्यासाठी येतात. सीटीएससाठी बँकेत ४ कर्मचारी कार्यरत असून, ते देखील अपुरे आहे.- राजेंद्र ढोक, महाव्यवस्थापक, एसबीआय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया