अकोला : मुंबई येथे पार पडलेल्या ४९ वी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्टेट चॅम्पियनशिप-२0१४ मध्ये अकोल्याच्या सौरभ निंबाळकर याने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. सौरभ १४ वर्षांखालील गटात सहभागी झाला होता. अमरावती येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत सौरभने उत्तम प्रदर्शन केल्याने त्याची निवड राज्यस्तर स्पर्धेसाठी करण्यात आली होती. सौरभचे वडील जितेंद्र निंबाळकर अकोला येथे पोलिस दलात कार्यरत असून, पोलिस बॉईज संघाचे बेस्ट अँथलिट राहिले आहेत. सौरभला वडील जितेंद्र यांच्यासह न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्यध्यापक कदम, क्रीडा शिक्षक उदय हातवळणे, साहेबराव वानखडे, प्रशिक्षक मुकेश तुंडलायत यांचे मार्गदर्शन लाभले. तो लोकमत बाल विकास मंचचादेखील सदस्य आहे.
राज्यस्तर स्पर्धेत सौरभ ठरला चपळ
By admin | Updated: October 27, 2014 22:42 IST