शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

मूर्तिजापूर तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकार; ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 14:47 IST

Agriculture News : मूर्तिजापूर तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारअसून, ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ९७ टक्के पेरणी झाली आहे, यावर्षी पीक परिस्थिती समाधानकार असून आंतरमशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. काही भागात नदी काठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे.              तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्षांक होता जवळपास हा लक्षांक पुर्ण झाला असून ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमीनत पुराचे पाणी शिरल्याने शेती खरडून गेल्याने ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्क्याच्या वर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत मिळणार असल्याची माहिती आहे. यासाठी ४३ लाख १ हजार २०० रुपये एवढा निधी अपेक्षित आहे याचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असल्याने शेतकऱ्यांना येत्या काळात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता त्या पेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. तर सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षी ती ४७ हजार १७७ हेक्टर झाली असल्याने त्या ३ हजार हेक्टर पेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. जुन - जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली असून या महिन्यात ४६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, सरासरीपेक्षा १२४ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकार असून १५ जून दरम्यान पेरणी झालेले सोयाबीन पोपट व फुलोरावस्थेत आहे,तर कपाशीला पाते पकडले आहे.असा आहे पीक पेरातुर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मुग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस, ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर कापूस ६ हजार ८७२ हेक्टर

फळ पीके सोडून झालेले नुकसान

फळ पीके सोडून जिरायती पीकाचे ६८ गावात नुकसान झाले. सोयाबीन ४६०.६७ हेक्टर, तुर ६४.९९ हेक्टर, कापूस ७३.३४ हेक्टर, मुग १२.५५ हेक्टर, उडीद १८ हेक्टर, तीळ.२० हेक्टर अशा ६२९.७५ हेक्टर जमिनीवरील पीकाचे नुकसान झाले आहे.

सद्यस्थितीत सोयाबीनवर उंट अळी तंबाखूचे पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा या सारख्या किटकनाशकांचा प्रश्नदुर्भाव आहे.  निरिक्षणे घेऊन किटकनाशकांचा वापर करावा, पोपट अवस्थेत २ टक्के सल्फरची फवारणी करावी, पाते असलेल्या कपाशीवर निंबोळी अर्क फवारणी करणे आवश्यक आहे, भविष्यात बोंडअळी टाळण्यासाठी अनावश्यक टॉनिक फवारणी टाळावी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जमीनीचे सर्वेक्षण झाले आहे व त्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूरजुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील फळबाग वगळता ६८ गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनान हेक्टरी मदत जाहीर करेल ती एकाच दिवसात शेतकरी बांधवांना वितरीत करण्यात येईल. -प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती