शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सर्वोपचार रुग्णालयातील धर्मशाळा कुलूपबंद

By admin | Updated: May 18, 2014 20:04 IST

अकोला सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेली धर्मशाळा मागील वर्षभरापासून कुलूपबंद!

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी असलेल्या धर्मशाळेला मागील वर्षभरापासून कुलूपबंद ठेवण्यात आले आहे. धर्मशाळा कुलूपबंद असल्याने शासनाचा लाखो रुपये खर्च पाण्यात जात असून, रुग्णांच्या नातेवाईकांना कडाक्याच्या उन्हातही उघड्यावर झोपावे लागत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दिवसाला शेकडो रुग्ण दाखल होत असून, त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी निवासासाठी धर्मशाळा बांधण्यात आलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पाण्याच्या टाकीजवळ सुमारे ४० लाख रुपये खर्चून धर्मशाळा बांधण्यात आलेली असून अद्यापही ती रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुली करण्यात आली नाही. चकाचक असलेल्या या धर्मशाळेचे बांधकाम तब्बल एक वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र अद्यापही या धर्मशाळेत रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश देण्यात आलेला नाही. कडाक्याचे ऊन असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांना वॉर्डाच्या आजूबाजूला उघड्यावर आधार शोधून झोपावे लागत आहे. सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या या धर्मशाळेत रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून या मागणीकडे डोळेझाक करण्यात येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात रोज सुमारे ७०० ते ८०० रुग्ण उपचारासाठी येत असून, त्यांच्यासोबत सुमारे एक हजार ते १२०० नातेवाईक येतात. एकूणच या ठिकाणी दिवसाला सुमारे १७०० ते १८०० जणांची ये-जा असून, यापैकी ५०० ते ६०० रुग्णांना दाखल करण्यात येते व त्यांच्यासोबत सुमारे ७०० नातेवाईक रुग्णालयात मुक्कामी असतात. रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आराम करण्यासाठी बांधण्यात आलेल्या धर्मशाळेचा रुग्णांच्या नातेवाईकांना कुठलाही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. धर्मशाळेत प्रवेश मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना उघड्यावरच झोपावे लागत असल्याने धर्मशाळा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तातडीने खुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. *टीबी रुग्णही बाहेरसर्वोपचार रुग्णालयातील टीबी रुग्णही वॉर्डाच्या बाहेर फिरत असल्याने इतरांना टीबी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे टीबी रुग्णांना वॉर्डातच थांबण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी रुग्णालय परिसरात राहणार्‍या रहिवाशांनी केली आहे. टीबी रुग्ण वॉर्डातच थांबल्यास इतरांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होणार नाही.