शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना मातीचा टिळा लावून जलपूजन!

By admin | Updated: March 19, 2016 01:56 IST

गांधीग्राम ते नेरधामणा जलदिंडीत शेकडो शेतकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग; कीर्तनातून जलप्रबोधन.

अकोला: पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हय़ात १६ ते २२ मार्चपर्यंत एक आठवडा जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त जलजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाण्याचे संवर्धन करणे कसे महत्त्वाचे आहे, यासाठीचे प्रबोधन कीर्तन, कविता, कथा, कथनातून अर्थात मनोरंजनातून शेतकरी, नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. माथा ते पायथा, मूलस्थानी जलसंधारण करणे काळाची गरज असल्याचे शेतकर्‍यांना समजावून सांगितले जात आहे. शुक्रवारी गांधीग्राम ते नेरधामणापर्यंत (बॅरेज) १0 किलोमीटर जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. गांधीग्राम येथे एका कार्यक्रमाद्वारे जलदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी जलजागृती अभियानामागील पार्श्‍वभूमी सांगून शेतकरी, नागरिकांना जल संवर्धनासाठीचे आवाहन केले. पाणी वापर संस्था प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे यांनी ह्यजल है तो कल हैह्ण या विषयावर शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. भाई प्रदीप देशमुख यांनी याबाबत आपले मत मांडले. या प्रसंगी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यावेळी दिंडीत सहभागी झाले. गोपाला गोपाला जल वाचवा, माती वाचवाचा गजर करीत जलदिंडी नैराट वैराट, राजापूर आदी गावातून धामणा येथे पोहोचली. प्रारंभी येथे शेतकर्‍यांना मातीचा टिळा लावून त्यांचे व जल कलशाचे पूजन करण्यात आले. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात शेतकर्‍यांचे कीर्तनाद्वारे प्रबोधन करण्यात आले. अंधश्रद्धेवर प्रहार करीत भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व कीर्तनातून मांडले.