शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संत रविदास महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

------------------------- भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात! कोरोनाचा फटका: आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल गुरांना टाकण्याची वेळ दानापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ...

-------------------------

भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात!

कोरोनाचा फटका: आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल गुरांना टाकण्याची वेळ

दानापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले. परिणामी, भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. भाजीपाला विक्री केली जात नसल्याने गुरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भाजीपाला लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे.

तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. शिवारात पाण्याची सुविधा असल्याने शेतकरी बारामाही भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. गत वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला, तसेच निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामातही शेतकऱ्यांचा लागवडी खर्च वसूल झाला नाही. त्यानंतर, अनलॉक प्रक्रियेत सर्व सुरू झाल्यानंतर जनजीवन रुळावर येत होते. मात्र, गत काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पैशांची जुळवाजुळव एकरी ५०,००० हजार रुपये खर्च करून टोमॅटो, वांगी, मिरची व इतर भाजीपाला पिकाची पेरणी केली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद केल्याने भाजीपाल्याची विक्री कुठे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिणामी, शेतकरी गुरांना भाजीपाला टाकीत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------------------------------

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सद्यस्थितीत टोमॅटो ५० रुपये कॅरेटने विक्री होत आहे, तसेच आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्री कुठे करावी, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आहेत.

विलास बाबाराव खवले, शेतकरी, दानापूर