- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: महान संत आणि शिख समाजाचे संस्थापक गुरू नानक देवजी यांच्या ५५० वा प्रकाश उत्सवा निमित्त समर्पित ननकाना साहिब पाकिस्तान येथून निघालेली आंतरराष्ट्रीय नगर किर्तन यात्रा शनिवारी अकोल्यात पोहचली. सामाजिक उत्थान परस्पर भाईचारा सोबतच गुरू नानक यांनी सांगितलेले मार्ग व संदेश जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचे लोकमतशी बोलताना प्रबंधक कमेटीचे सदस्य करणसिंह यांनी सांगितले.ही यात्रा खामगाव येथून निघून सकाळी शिवणी येथे पोहचली. या ठिकाणी शिख बांधवांनी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. गुरुद्वारा जन्मस्थान श्री ननकाना साहेब येथून यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रा भारतातील विविध शहरातून मार्गक्रमण करीत ऐतिहासिक गुरुधामा येथून निघून गुरुद्वारा श्री बेर साहेब, सुलतानपूर लोधी कपूरथला पंजाब येथे समापन होणार आहे. दरम्यान, या यात्रेत हस्तलिखित पुरातन श्री गुरुग्रंथ साहेब, श्री गुरुनानक देवजी यांच्या पवित्र चरण पादुका आणि बट्टे (वजन) दर्शनाचा लाभ भाविकांना होणार आहे, अशी माहिती गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष सरदार रामिन्दरसिंह छतवाल, सचिव सरदार जोगींदरसिंह सेठी, पु. सिंधी जनरल पंचायत तथा करण चिमा यांनी दिली.
संत गुरू नानक प्रकाश उत्सव आंतररराष्ट्रीय यात्रा अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 14:44 IST
भारतातील विविध शहरातून मार्गक्रमण करीत ऐतिहासिक गुरुधामा येथून निघून गुरुद्वारा श्री बेर साहेब, सुलतानपूर लोधी कपूरथला पंजाब येथे समापन होणार आहे.
संत गुरू नानक प्रकाश उत्सव आंतररराष्ट्रीय यात्रा अकोल्यात
ठळक मुद्देगुरुद्वारा जन्मस्थान श्री ननकाना साहेब येथून यात्रेला प्रारंभ झाला आहे.गुरू नानक यांनी सांगितलेले मार्ग व संदेश जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली.