शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अकोला उपकेंद्रलवकरच होणार

By admin | Updated: March 18, 2015 01:44 IST

आकाश फुंडकर यांनी वेधले लक्ष; विनोद तावडे यांची ग्वाही.

खामगाव (जि. बुलडाणा): अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंना आनंदाची बातमी म्हणजे त्यांचे अमरावती जाण्याचे हेलपाटे येणार्‍या काही दिवसात थांबणार आहेत. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.अँड. आकाश फुंडकर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे करण्याच्या केलेल्या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात होकार दिला आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या २0१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १७ मार्च रोजी विधानसभा सभागृहात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान ना. तावडे यांनी अकोला उपकेंद्र करणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून मागणी करीत असलेल्या विद्यार्थी व सामाजिक संस्था, संघटनांना मोठा दिलासा मिळाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे १९८३ साली झाली. या विद्यापीठांतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. स्थापनेनंतर या विद्या पीठाचे अकोला येथे अतिरिक्त उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. परीक्षा फॉर्म, शुल्क व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांंना अमरावती गाठावे लागते. साध्या छोट्याशा त्रुटींकरिता विद्यार्थ्यांंना विद्यापीठात जावे लागते. विद्यार्थ्यांंना सुमारे २00 ते २५0 किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे एक-दोन दिवस छोट्याशा कामाकरिता वाया घालावे लागतात. यामुळे त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसानही होत आहे. यासाठी अमरावती विद्यापीठाचे अकोला येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांंपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व इतर सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने सुरू होती. दरम्यान, मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थ्यांंची ही समस्या खामगावचे युवा आ.अँड. आकाश फुंडकर यांनी सभागृहात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांच्याकडे केली. शिक्षण विभागाच्या पूरक मागण्यांवर सभागृहात १७ मार्च रोजी चर्चा करण्यात आली असता या मागणीला ना. तावडे यांनी सकारात्मक उत्तर देत अकोला येथे विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.