शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना संजीवनी; कुं भारी तलावातील विहिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:05 IST

उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे. 

ठळक मुद्देअकोला एमआयडीसी अधिकार्‍यांकडून पाहणी सुरू कुंभारी तलावातील विहिरीतून घेणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे.        महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या  वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणीपुरवठा करणार्‍या  खांबोरा प्रकल्पाने पाणी देणे बंद केले. त्यामुळे सप्टेंबरपासून  एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणीपुरवठा सुरू  केला; मात्र कुंभारी तलावातील पाणीदेखील पुरेसे नाही.  पावसाची कृपा झाली नाही, तर ऑक्टोबरमध्ये उद्योगांना  पाणी पुरविणे अशक्य होईल. त्यामुळे अकोल्यातील  उद्योजक आणि एमआयडीसी अधिकारी चिंतातुर झाले  आहेत. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी पर्याच म्हणून  परिसरातील चार विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकार्‍यांपुढे ठेवला आहे.  औद्योगिक वसाहतीमधील ८९0 उद्योगांना कधीकाळी  कुंभारी तलावातूनच पाणीपुरवठा व्हायचा. कुंभारीचा तलाव  आजपर्यंंंत कोरडा पडल्याचे कुणाला आठवत नाही; मात्र  यंदा पाऊस नसल्याने कुंभारी तलावाची पातळी वाढू शकली  नाही. गोरव्हा, कातखेडा, येवता, एरंडा-परंडा परिसरात  पाऊस झाला, तर लोणारमेघ नाल्यातून पाण्याचा लोंढा  कुंभारी तलावात येतो. त्यामुळे या तलावातील पाणी शक्य तोवर आटत नाही.जवळपास शंभर एकरच्या विस्तीर्ण  क्षेत्रफळात तलाव व्यापला आहे. कुंभारी ते येवतापर्यंंंत स् पर्शलेल्या या तलावात कधीकाळी लहान-मोठय़ा सहा  विहिरी होत्या. त्या आता या तलावात दिसत नाहीत. तलाव  कोरडा पडल्यास त्यातील सहाही विहिरींचा उपसा करून  त्यातील गाळ काढल्यास पुन्हा झरे येथे येऊ शकतात, असे  गावकर्‍यांचे मत आहे. जर भविष्यात पाणीटंचाई निर्माण  झाली, तर या विहिरी कायम पाणी देत राहतील. कारण  कुंभारी परिसरातील पाण्याची पातळी अजूनही खालावलेली  नाही. आता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय आणि  एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.

आजपर्यंंंत कुंभारीचा तलाव कोरडा पडलेला पाहिला नाही.  कुंभारीत कधीच पाणीटंचाई झाली नाही. उन्हाळ्यातही येथे  पाणी समस्या कधी आली नाही. त्यामुळे कुंभारी तलावातील  विहिरी उपसून त्याचा उपयोग केला गेला पाहिजे.-सिंकदर शहा, रा. कुंभारी.