शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णेतील जलकुंभी ठरू शकते संजीवनी!

By admin | Updated: December 13, 2014 00:42 IST

जलकुंभी काढण्यासाठी व्यापक पुढाकाराची गरज.

डॉ. किरण वाघमारे / अकोलाशहरातील मोर्णा नदीच्या प्रवाहात सर्वात मोठा अडथळा बनली आहे, ती या नदीतील जलकुंभी. या जलकुंभीचा नायनाट करणे अतिशय कठीण बनले आहे. दरवर्षी लाखो रुपये यावर खर्च केले जातात; परंतु परिस्थिती जैसे थे आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूरच्या धर्तीवर जर जलकुंभीचा उपयोग खत म्हणून केला गेला तर जलकुंभी शेतकर्‍यांसाठी संजीवनी बनू शकते; परंतु यासाठी व्यापक पुढाकार घेण्याची गरज आहे. वाशिम जिल्ह्यातून उगम पावणार्‍या मोर्णा नदीला प्रदूषणाची लागण होते ती कौलखेडनंतर. कौलखेडच्या पुढे थेट पोलिस प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोर्णा नदी दूषित झालेली दिसते. मोर्णेकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की, मोठय़ा प्रमाणात जलकुंभी उगवली आहे. त्यामुळे मोर्णेचे पाणी वाहताना दिसत नाही. जलकुंभीने नदीला व्यापून टाकले आहे. दरवर्षी महापालिकेच्यावतीने जवळपास ५ लाख रुपये जलकुंभीच्या निर्मूलनावर खर्च करण्यात येतो; परंतु त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. उलट दिवसेंदिवस जलकुंभी अधिकच फोफावत चालली आहे. या वनस्पतीमुळे नदीतील जलचर प्राणी नष्ट झाले आहेत आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा त्रास अकोलेकरांना चांगलाच जाणवू लागला आहे. जलकुंभीने पिण्यायोग्य पाणी प्रदूषित केले आहे. जलकुंभी पाण्यात असणे घातक आहे. मात्र, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ती शेतकर्‍यांसाठी संजीवनी बनू शकते. जलकुंभी पाण्यातून काढल्यानंतर ती गावाच्या बाहेर एका मोठय़ा खड्डय़ात मातीसह पाच थरात टाकली की, ८ महिन्यानंतर त्याचे चांगले खत तयार होते. हे खत ऊस, गहू, ज्वारी, कापूस या सर्वच पिकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कोल्हापूर महापालिकेलेने रंकाळा तलावातील जलकुंभी काढून तिचा खत म्हणून उपयोग सुरू केला आहे. त्याचे चांगले परिणामदेखील तिथे दिसू लागले आहेत. जलकुंभी काढल्यामुळे पाणी मोकळे होऊन वाहू लागते, परिणामी जलचर प्राण्यांची उत्पत्ती वाढून निसर्गचक्र संतुलित होऊ शकते. सोबतच जलकुंभीचा उपयोग खत म्हणून शेतकर्‍यांना मोफत उपलब्ध होऊ शकते. महागडी खते घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी जलकुंभी वरदान ठरू शकते. यासाठी महापालिका प्रशासनाने व्यापक विचार करण्याची गरज आहे.