शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दादाराव देशमुख यांना सेवाश्री पुरस्कार

By admin | Updated: August 29, 2016 01:27 IST

विदर्भ केसरी ब्रजलालजी बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सेवाश्रय’चा पुरस्कार.

अकोला, दि. २८: २१ वा विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा रविवार, २८ ऑगस्ट रोजी गोरक्षण मार्गावरील खंडेलवाल भवनात पार पडला. यंदा हा पुरस्कार पातूर-चरणगाव येथील रहिवासी कृषिभूषण दादाराव आनंदराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला. विदर्भ केसरी ब्रजलालजी बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, समाजाच्या उन्नतीसाठी विशेष कामगिरी करणार्‍या व्यक्तीस सन्मानित करण्याची ही परंपरा सेवाश्रयचे संस्थापक सत्यनारायण रांदड यांनी १९९५ मध्ये सुरू केली. वर्ष २0१६ चा सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा रविवारी खंडेलवाल भवनात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू तथा ज्येष्ठ संपादक डॉ. वेदप्रकाश मिश्रा, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाबीजअकोला चे महाप्रबंधक अशोक अमानकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पातूर-चरणगावचे रहिवासी कृषिभूषण दादाराव देशमुख यांना सपत्नीक २१ वा विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी सेवाश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. २0१५ चा २0 वा सेवाश्री पुरस्कार अकोल्याचे सानेगुरुजी न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक मोरेश्‍वर उपाख्य छोटू मोर्शीकर गुरुजी यांना घोषित झाला होता. पुरस्कार स्वीकारणारे मोर्शीकर गुरुजी व पुरस्कार देणारे सत्यनारायण रांदड यांचे गतवर्षी निधन झाले. गतवर्षीचा हा २0 वा ह्यसेवाश्रीह्ण पुरस्कार रविवारी मान्यवरांच्या हस्ते मोर्शीकर गुरुजींचे बंधू अविनाश मोर्शीकर यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना दादाराव देशमुख यांनी पातूर तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी केलेली कामगिरी स्पष्ट करून मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, की समाज हा अनुकरणशील असतो. नि:ष्पक्ष, निरपेक्ष भावनेतून निष्काम सेवा करणारे मोती सेवाश्रीमध्ये गुंफले आहेत. ते समाजाला सातत्याने प्रेरणादायी ठरतील, असे त्यांनी सांगितले. अशोक अमानकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सत्यनारायण रांदड यांचे सुपुत्र तथा क्विक अँडचे संस्थापक विजय रांदड यांनी कार्यक्रमाचे संयोजक म्हणून भूमिका सांभाळली. पुरस्कार वितरण सोहळय़ात विजय रांदड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, नानासाहेब चौधरी, गोपाल खंडेलवाल, दिलीप बाबा, डॉ. हेडा, नारायण भाला, प्रकाश भंडारी, नीलेश मालपाणी, राजेश शर्मा यांच्यासह शहरातील अनेक गणमान्य उपस्थित होते. निवड समितीचे सदस्य प्रा. राजाभाऊ देशमुख, डॉ. राम प्रकाश वर्मा, राकेश पुरोहित, मनीष जोशी, डॉ. किरण वाघमारे, शौकतअली मीरसाहेब, रमेश बाहेती, हरीष मानधने, महेंद्र कविश्‍वर, प्रा. एस. के. शर्मा आदिंनी परिश्रम घतेले.