शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियांनी धरण पोखरले, प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 18:52 IST

आकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख परिसरात शहापूर बृहत प्रकल्पांतर्गत धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे.

- विजय शिंदेआकोट : आकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख परिसरात शहापूर बृहत प्रकल्पांतर्गत धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाच्या पात्रात अवैधरित्या उत्खनन करणार्‍या रेती माफीयांनी चक्क धरणपात्र पोखरल्याचे आढळून आले आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत रेतीमाफियांनी सुरुंग केले आहेत. सदर सुरुंगांची लांबी-रुंदी पाहता देशाच्या सीमेवर आढळून येणार्‍या सुरुंगापेक्षाही धोकादायक परिस्थिती धरण पात्रात पाहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे धरण परिसराला धोका निर्माण झाला असून, रेती माफियांचे कृत्य भविष्यात दुर्दैवी घटनेला निमंत्रण देणारे ठरत आहे.आकोट तालुक्यातील पणज या गावाजवळून वाहणार्‍या पठार नदीवर लघु पाटबंधारे योजनेंतर्गत शहापूर बृहत या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाकरिता शासनाने 261 कोटी रुपये खर्चून धरणाची निर्मिती केली आहे. या धरणाची लांबी 55.10 मीटर व उंची 17.23 मीटर असून, धरणाची एकूण साठवणूक क्षमता 2.790 द.ल.घ.मी. आहे. पिण्याच्या पाण्याकरिता, सिंचन व औद्योगिक वापराकरिता आरक्षित करण्यात आले आहे. सदर धरणात पाणीसाठा न झाल्याने व गाळ असल्याने रेती माफियांनी धरण पात्रात अक्षरश: 20 ते 30 फूट खोल असे सुरुंग तयार करून रेतीचा उपसा केला आहे. या सुरुंगामधून रेती बाहेर काढून त्या ठिकाणी गाळून त्याची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत आहे. या सुरुंगाला रेती माफियांनी विशिष्ट आकार दिले आहेत. तसेच आतमधून रेती काढण्याकरिता पायर्‍या सुद्धा केल्या आहेत.जमिनीच्या आतमध्ये तसेच धरणाच्या भिंतीपर्यंत हे सुरुंग खोदलेले आहेत. रेती माफिया हे रात्रीच्या वेळी हा सर्व प्रकार करीत आहेत. महसूल विभाग या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याही नजरेस पडणार अशी स्थिती या रेती माफियांनी करून ठेवली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर रात्री काळोखात बुडाल्यानंतर या ठिकाणी रेतीचा उपसा करण्यात येतो. यादरम्यान कारवाई करण्याकरिता जाणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांच्याही जिवाला धोका निर्माण होऊ शकेल अशा प्रकारचे सुरुंग या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत. रेती माफियांनी चक्क धरणाचे पात्र व धरणाच्या आजूबाजूचा परिसर सुरुंग करुन मोठमोठे खड्डे निर्माण केले आहे. या सुरुंगमध्ये रेती काढण्याकरिता जाणार्‍या मजूरांसोबत दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातून रात्रीच्या वेळी रेतीची चोरी करणार्‍या माफीयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेती चोरट्यांनी धरण परिसरात केलेल्या सुरूंगाबाबतची तसेच रेती चोरीच्या प्रकाराबाबतची माहिती एस.डी.ओ. तथा जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली आहे.- अविनाश कुंभारसहाय्यक अभियंता श्रेणी 2अकोला पाटबंधारे विभाग------------------धरण परिसरातील सुरक्षिततेची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाची आहेत. त्यांच्या स्तरावर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसुल विभागाने यापूर्वी दंडात्मक व फौजदारी कारवाया केल्या आहेत. सुरुंगाची परिस्थिती पाहिल्यानंतर रेती माफीयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.- विश्वनाथ घुगेतहसीलदार, आकोट-----------------धरण परिसरातील पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात सुरुंग आढळून आले आहेत. हा प्रकार मानवी जीवाशी खेळणार आहे. याबाबत रितसर तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.- मिलिंद बहाकरपोलीस निरीक्षक,