शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यालगतचा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र

By admin | Updated: February 16, 2016 00:59 IST

लोणार सरोवरालगतच्या १00 मीटर परिसरात खोदकामासह बांधकामावर येणार बंदी.

मयूर गोलेच्छा/लोणार : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरालगतच्या ३८३.२२ हेक्टर परिसराला राज्यातील सर्वात लहान वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित केले असून, आता पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोणातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २0 नोव्हेंबर २0१५ रोजी वन्य जीव अभयारण्याच्या चारही बाजूचा १00 मीटरचा परिसर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार अतिसंवेदशील म्हणून घोषित करण्यासाठी अधिसूचना काढलेली आहे. यामुळे सरोवरालगतच्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील १00 मीटर परिसरात कुठल्याही प्रकारचे खोदकाम, नवीन बांधकाम, वृक्षतोड, ध्वनिप्रदूषण, प्लास्टिक वापरावरही बंदी घातली असून, ही अधिसूचना १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या लोणारच्या दक्षिणेस पाच लाख वर्षांपूर्वी उल्कापातामुळे वैशिष्ट्यपूर्ण खार्‍या पाण्याच्या सरोवराची निर्मिती झाली होती. सरोवरालगतच्या घनदाट जंगलात अनेक वन्य प्राणी वास्तव्यास असल्याकारणाने वनविभागाने ८ जून २000 साली सरोवरालगतच्या परिसराला राज्यातील सर्वात लहान वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्यात बिबट, लांडगा, कोल्हा, तडस, माकड, जंगली मांजरसह अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य आहे. तसेच अंजन, अशोक, चंदन, बहेडा, बेल, पळस यासारख्या दुर्मीळ वनौषधी वनस्पतीही आढळून येतात. सरोवरातील अभयारण्य परिसरात अनेक पुरातन मंदिरे असून, सरोवरातील या सर्व घटकांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे जगभरातील संशोधकांना लोणार सरोवर आणि लगतचा परिसर संशोधनाकरिता नेहमीच आपल्याकडे मोहित करतो. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या सरोवरातील अवशेष लगतच्या १00 मीटर परिसरात विखुरलेले आहेत. संशोधनात्मकदृष्ट्या हा परिसर अधिक महत्त्वपूर्ण असल्याकारणाने सरोवरलगतच्या चारही बाजूने १00 मीटरचा परिसर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला असून, त्याआधी पर्यावरण विभागाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. याकरिता राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या सक्षम अधिकार्‍यांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाच्या पर्यावरण, वन, नगरविकास, पर्यटन, नगरपालिका, महसूल, कृषी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे आणि नगर रचनाकार या सर्व विभागांच्या सूचनांचा विचार केल्या जाणार आहे.अतिसंवेदनशील क्षेत्रात या कामांवर येणार बंदीपर्यावरणाचे संरक्षण होण्याकरिता सरोवरलगतच्या अतिसंवेदशील क्षेत्रातील १00 मीटर परिसरात भविष्यात गौण खनिज उत्खनन, खोदकाम, आरामशीनची निर्मिती, पर्यावरणाला हानी पोहोचविणार्‍या पदार्थांची निर्मिती उद्योग, जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे उद्योग, प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर, नवीन हॉटेल तसेच घरांचे बांधकाम, वृक्षतोड, रासायनिक शेती यावर पूर्णत: बंदी येणार आहे.