शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच हंगामात पिकांना अल्प आणि अतिवृष्टीचाही फटका

By admin | Updated: August 13, 2015 22:55 IST

पावसाच्या दडीने वाढ खुंटली, आता अतिपावसाने पिके पडताहेत पिवळी.

अकोला : पावसाने दिलेली एक महिन्याची दडी आणि या दडीनंतर सातत्याने सुरू असलेला पाऊस; परिणामी एकाच हंगामात अल्पवृष्टी आणि अतवृष्टीचाही फटका पिकांना सोसावा लागला आहे. पावसाने ऐन हंगामात तब्बल एक महिना दडी दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून, आता सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. दोन्ही परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने एक महिना दडी दिली. पिकांना पाणी मिळाले नसल्यामुळे फांद्या व पानांची आवश्यक प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व फुलोरा कमी प्रमाणात आला. त्यावेळी पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्यामुळे शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते; मात्र पावसाने साथ दिली नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि गत तेरा दिवसांमध्ये ४00 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे, त्याचा विपरीत परिणाम होऊन पिके पिवळी पडत आहेत. झाडांना आलेला फुलोरा पावसामुळे झडत आहे. त्यामुळे हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक ठरत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे.; मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडत आहे. सोयाबीनवर उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकर्‍यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. *विविध किडींचा हल्ला सोयाबीन पिकावर सध्या उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. पिके लहान व झाडांना पाणी कमी असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी असला, तरी नुकसान मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता आहे.