शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याच्या कर्तृत्वाला शासनाचा सलाम

By admin | Updated: March 19, 2015 01:42 IST

राज्य शासनाची मोतीराम लहाने कृषी समृद्धी योजना!

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबत नसून, या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी वर्‍हाडच्या मातीतील अकोला जिल्हय़ातील भूमिपुत्र स्व. मोतीराम लहाने यांच्या नावाने युती शासनाने कृषी समृद्धी योजना सुरू केली असून, बुधवारी जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५0 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शासनाने जिल्ह्यातील कर्तृत्वाला हा सलाम केला असल्याचे मानले जात आहे. कर्तृत्ववान, निष्ठावान व विकासाची जाण असलेल्या नेत्याची फळी या जिल्हय़ात होती. त्यामध्ये मोतीराम लहाने यांचे नाव घेतले जाते. बाश्रीटाकळी तालुक्यातील पिंजर या गावात जन्मलेले लहाने यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सामाजिक कारकिर्दीला सुरुवात झाली. जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्ष या राजकीय चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. सन १९९५ मध्ये पहिल्यांदा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी विजयाची पताका फडकविली होती. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी वर्‍हाडच्या विकासाचे मुद्दे उपस्थित केले. राज्यसभा सदस्य निवडणुकीत तर त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव करू न विजय प्राप्त केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोलाचा हातभार लावला. वर्‍हाडच्या विकासाला सातत्याने दिशा देण्याचे काम लहाने यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्ष विस्तार करण्याचे काम केले. विकासाची जाण असलेल्या या नेत्यांची दखल शासनाने घेतली असून, त्यांच्या नावाने कृषी समृद्धी योजना लागू केली आहे. यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याने या जिल्हय़ात ही योजना पथदश्री प्रकल्पाच्या स्वरू पात राबविण्यात येईल. त्यानंतर या योजनेचा विस्तार केला जाणार आहे.