शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यावसायिक पुन्हा झाले हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : हातावर पाेट असलेल्या सलून व्यावसायिकांना वाढलेल्या लाॅकडाऊनमुळे राेजगाराची चिंता लागून आहे. राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : हातावर पाेट असलेल्या सलून व्यावसायिकांना वाढलेल्या लाॅकडाऊनमुळे राेजगाराची चिंता लागून आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत पुन्हा १५ दिवस वाढवल्याने सलून व्यावसायिक हतबल झाले आहेत. मागील १५ दिवसात कसलीही शासकीय मदत मिळाली नसतानाही तग धरून दिवस काढणाऱ्या या व्यावसायिकांसमाेर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

अकाेला जिल्ह्यामध्ये मागील १५ दिवसांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. राज्यात ‘ब्रेक द चेन’ लागू करताना दुर्बल घटकांना आणि कारागीर, लघु व्यावसायिकांना अर्थसाहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली होती.

प्रत्यक्षात मागणी करूनही सलून व्यावसायिकांचा या मदतीमध्ये विचार झाला नाही. गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल सात महिने व्यवसाय बंद होता. यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले. राज्यभरातील सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. नागपुरात आणि विदर्भातही आत्महत्यांच्या घटना घडल्या. हा अनुभव लक्षात घेता, यावेळी लॉकडाऊन लागू करताना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आंदोलने करूनही ही मागणी दुर्लक्षित राहिली. लॉकडाऊनला पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने सलून कारागिरांचा संयम सुटला आहे. जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न या वर्गासमोर असल्याने जटील सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. ही अवस्था लक्षात घेऊन सरकारने सर्व सलून कारागीर, दुकानदारांना अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी अकाेला जिल्हा नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गजानन वाघमारे यांनी केली आहे.

सरकारने मदतीचे पॅकेज द्यावे

गतवर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये समाजसेवी संस्थांकडून धान्याचे किट मिळाल्याने मदत झाली. यंदा परिस्थिती विपरीत आहे. रुग्णसंख्या वाढली आहे, उपचारासाठी पैसा नाही. आजाराने मरण्यासोबतच सरकारने समाजातील कारागिरांना आणि व्यावसायिकांना उपाशी मारू नये. सरकारने ज्याप्रमाणे इतर घटकांसाठी पॅकेज जाहीर केले आहे, त्याचप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.