शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात दरमहा साडेचार हजार चिनी टायरची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:27 IST

एकट्या अकोल्यात दर महिन्याला साडेचार हजार चिनी बनावटीचे टायर विकले जात आहेत.

ठळक मुद्देतकलादू असलेल्या या टायरलाही मोठी मागणी आहे. टायरची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी. चीनमधील टायरचे आयुष्यही कमी.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारत चीन तणावानंतर आत चिनी मालाच्या विरोधात बहिष्कारचे अस्त्र उपसण्याची तयारी नागरिकांनी केली आहे. या पृष्ठभूमीवर चिनी बनावटीच्या कोणत्या वस्तूंची विक्री सर्वाधीक होते याची माहिती घेतली असता इलेक्ट्रानिक्स वस्तू, मोबाईलसोबतच चार चाकी गाडीच्या चिनी बनावटीच्या टायरलाही नागरिकांची पसंती असल्याचे समोर आले. एकट्या अकोल्यात दर महिन्याला साडेचार हजार चिनी बनावटीचे टायर विकले जात आहेत.भारतात कारसाठी वापरण्यात येणारे टायरही आता मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात करण्यात येत आहेत. ब्रॅण्डेड कंपन्यांच्या टायरला जेवढी मागणी आहे, तेवढीच मागणी चीनमधून निर्मिती केलेल्या तसेच बऱ्याच प्रमाणात तकलादू असलेल्या या टायरलाही मोठी मागणी आहे. अकोला जिल्ह्यात चिनी टायरची विक्री महिन्याला ४ ते ४ हजार ५०० एवढी आहे. तर ब्रॅण्डेड कंपन्यांचे टायर यापेक्षा दुप्पट म्हणजेच महिन्याला ८ ते ९ हजार टायर विकल्या जात असल्याची माहिती आहे. एखाद्या कारच्या ब्रॅण्डेड कंपनीच्या टायरची किंमत ४ हजार रुपये असेल तर चीनमधील टायरची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमीच असल्याची माहिती टायर विक्रेते रिक्कीसिंग सेठी यांनी दिली. तर चीनमधील टायरचे आयुष्यही ब्रॅण्डेड टायरपेक्षा कमीच असल्याचे वास्तव आहे. चीननिर्मित टायर अधिक प्रमाणात टॅक्सीसाठी वापरण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. घरगुती कार किंवा इतर वाहनांमध्ये अत्यंत नगण्य प्रमाणात चिनमधील टायर वापरण्यात येते. त्यामुळे स्वस्त असलेल्या चीनमधील टायरचे आयुष्यही कमी असल्याने ब्रॅण्डेड टायरच योग्य असल्याचे सेठी यांनी सांगितले.

वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा चीनमधूनदेशातील कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये लावण्यात येणारी उपकरणे तसेच आरोग्य तपासणीसाठी लागणारे साहित्य आणि अ‍ॅलोपॅथीसाठी वापरण्यात येणाºया गोळ्यांच्या पावडरची मोठ्या प्रमाणात आयात ही चीनमधूनच होते. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया तसेच तपासणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधूनच आयात करण्यात येत आहे. यामध्ये व्हेंटिलेटर, आॅक्सिजन कॉन्सेट्रेटर, नेब्युलायझर, मधुमेह तपासणीसाठी येणारे यंत्र आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या स्ट्रीप, दमा तसेच अस्थमा तपासण्यासाठी आवश्यक असलेली सीपीएफ यंत्र हे चीनमधूनच आयात करण्यात येते.

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार