शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्तऐवजाद्वारे शेतीची विक्री

By admin | Updated: March 15, 2015 01:30 IST

सुशील खोवाल, जसपालसिंह नागरासह ११ बड्या व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल.

अकोला - बनावट दस्तऐवज आणि खोट्या स्वाक्षरी करून संगनमताने शेतीची खरेदी-विक्री करणार्‍या शहरातील ११ जणांविरुद्ध शनिवारी रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. जसनागरा हॉटेलचे संचालक जसपालसिंह नागरा, उद्योजक सुशील खोवाल व सुभाष चांडक यांच्यासह ११ जणांविरुद्ध या फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरालगत असलेल्या मलकापूर येथील गजानन वाटिकेमधील रहिवासी सारिका चंद्रशेखर सुंदरबंसी यांच्या आई-वडिलांच्या नावावर असलेली आणि वारसाहक्काने त्यांच्या नावे झालेली अक्कलकोट परिसरातील शेत सर्व्हे क्रमांक ३/९ मधील कोट्यवधी रुपयांची शेती जसपालसिंह नागरा, सुशीलकुमार खोवाल, सुभाष चांडक, सरीता विजय ठाकूर आणि जब्बीर हुसेन सैफ्फुद्दीन तालावाला यांनी बनावट दस्तऐवज व खोट्या स्वाक्षरींच्या आधारे प्रेमाबाई उमाशंकर यादव, राजू उमाशंकर यादव, अमीत उमाशंकर यादव, सपना उमाशंकर यादव, रुपाली उमाशंकर यादव यांच्याकडून खरेदी केली. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये २५ सप्टेंबर २0१२ ते २१ मार्च २0१३ या कालावधीत हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला असून, यामध्ये सारिका सुंदरबंसी यांची फसवणूक करण्यात आली. त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली, मात्र पोलिसांनी सदर प्रकरण तपासात ठेवले. त्यानंतर सुंदरबंसी यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सिटी कोतवाली पोलिसांनी जसनागरा हॉटेलचे संचालक जसपालसिंह नागरा, उद्योजक सुशीलकुमार खोवाल, सुभाष चांडक या बड्या हस्तींसह शहरातील ११ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६८, ४७१, १२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.