शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्तावेजाद्वारे प्लॉटची विक्री

By admin | Updated: September 1, 2015 02:04 IST

नागपूरचे चौघे पोलिसांच्या ताब्यात ; स्टेट बँक शाखाधिका-यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला प्रकार.

अकोला : नागपूर येथील वाडी परिसरात असलेल्या प्लॉटची बनावट दस्तावेजाद्वारे २५ लाखात विक्री करणार्‍या नागपूर येथील चार जणांना सिव्हिल लाईन्स पोलिसांनी सोमवारी दुपारी संशयावरून ताब्यात घेतले. बनावट दस्तावेजाद्वारे शिवणीतील स्टेट बँकेत उघडलेल्या एका खात्यात १४ लाखांची रक्कम जमा झाल्यानंतर बँक व्यवस्थापकाच्या दक्षतेमुळे फसवणुकीचा हा प्रकार उजेडात आला. नागपूर येथील प्रॉपर्टी ब्रोकर आशीष झा याने निखिल रामचंद्र शिंदे, सादिक शहा व किशोर ढाले या तिघांना सोबत घेऊन संगनमताने बनावट दस्तावेजाद्वारे वाडी परिसरातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार काही दिवसांपूर्वी केला होता. हा प्लॉट एका इसमास २५ लाखात विकल्यानंतर ही रक्कम जमा करण्यासाठी निखिल शिंदे याने येथील जठारपेठ परिसरातील महेंद्र आळशी यांच्या नावाचे बनावट मतदान ओळखपत्र तयार केले. या मतदान ओळखपत्राच्या आधारे शिवणीमधील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खाते उघडले. या खात्यात २ हजार ५00 रुपयांची रक्कम शिंदेने ठेवली होती. त्यानंतर काही दिवसांनी खरेदीदाराने १४ लाख रुपयांची रक्कम या खात्यात जमा केली. ही रक्कम जमा होताच रक्कम काढण्यासाठी आशीष झा, निखिल शिंदे, सादिक शहा व किशोर ढाले सोमवारी एम एच ४0 एसी ४५५९ या कारने अकोल्यात दाखल झाले. स्टेट बँकेत गेल्यानंतर बँक व्यवस्थापक नयना कांबळे यांना खात्यातील रकमेवरून संशय आल्याने त्यांनी आळशी यांच्या नावाचे खाते गोठवीत चारही जणांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी बँक व्यवस्थापकाशी वाद घातला. याचवेळी शिवणीत ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणूकसुरू असल्याने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे पप्पू ठाकूर व उमेश सुगंधी तेथेच उपस्थित होते. त्यांना या वादाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून चारही जणांना ताब्यात घेतले. त्यांना ठाण्यात आणून कसून चौकशी केल्यानंतर बनावट मतदान ओळखपत्र व कार जप्त करण्यात आली. या प्रकरणाची माहिती नागपूर पोलिसांना देण्यात आली असून त्यांच्या चौकशीनंतर या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.