शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

८६४ च्या पाकिटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्रचालकावर गुन्हा दाखल

By रवी दामोदर | Updated: May 29, 2024 16:15 IST

कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत; परंतु बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

अकोला : जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बीटी बियाणाचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचे कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील अश्विनी ॲग्रो एजन्सीचे प्रोप्रा. रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत; परंतु बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. असे असताना ‘त्या’ वाणाच्या बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून प्रतिपाकिट ८६४ रुपये मूळ किंमत असलेले १४०० रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडले. त्यामुळे तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी तेल्हारा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील मे. अश्विनी ॲग्रो एजन्सीचे प्रोप्रायटर रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकाने केली कारवाई

मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, जि.प.चे जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनात तालुका, जिल्हा भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. या पथकामध्ये मोहीम अधिकारी महेंद्रकुमार सालखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, विस्तार अधिकारी कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले यांचा समावेश होता.

टॅग्स :Akolaअकोला