शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत गुटखा पदार्थाची सर्रास विक्री

By admin | Updated: August 30, 2014 01:56 IST

अकोला-पुर्णा रेल्वेमार्गावरील रेल्वेमध्ये अवैध घुटका विक्रीचे वास्तव लोकमत स्टिंग ऑपरेशनने उघडकीस.

वाशिम : ऐन गर्दीच्या हंगामात अकोला - पुर्णा या दक्षीण-मध्य रेल्वेमार्गावर धावणार्‍या रेल्वेगाडयांमध्ये बेकायदा विक्रे त्यांचा वावर वाढला आहे. रेल्वेगाडीमध्ये विनातिकिट शिरून महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला गुटखापदार्थासह सिगारेट, तंबाखू व ज्वलनशिल वस्तूची विक्री करण्याचा गोरखधंदा करणार्‍या विक्रेत्यांचा पर्दाफाश लोकमतने २८ ऑगस्ट रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण ने उघड करून रेल्वे पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आणला. अकोला - पुर्णा या दक्षीण-मध्य रेल्वेमार्गावरील पॅसेंजर गाडीमध्ये घुसून सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करून लाखोचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला केवळ दहा दिवस उलटून गेले. या घटनेमधून रेल्वे पोलिस आपले कर्तव्य प्रामाणीकपणे पार पडतील अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, पॅसेंजर असो वा ए क्सप्रेस गाडी असो कोणत्याही गाडीमध्ये विनातिकिट कुणीही शिरून प्रवाशांसोबत वाट्टेल ते करू शकत असल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग ऑ परेशनमधून उघड झाला. प्रवाशांना लुटण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढत आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मात्र दक्षीण- मध्य रेल्वे पोलिस याकडे डोळेझाक करत आहेत. दक्षीण- मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये या विक्रेत्यांचा राजरोस व्यापार सुरू आहे. अकोला ते पुर्णा या मार्गावर धावणार्‍या गाड्यामध्ये रेल्वे पोलिसांचे नियंत्रण नसल्याने अनेक वेळा रेल्वे सुरक्षा धोक्यात आल्याचे उदाहरणे आहेत. अकोला ते पुर्णा मार्गावर दररोज २0 ते २५ लोक चहा, वडापाव, पाणी, थंडपेये, खेळणी, आईस्क्रीम सिगारेट, याशिवाय प्रतिबंधित गुटखा आदीची विक्री करणारे गाड्यामध्ये बिनदिक्कत शिरून विक्री करत असल्याचे स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले. रेल्वे प्रशासनाने विक्रेत्यांसाठी परवाने दिले आहेत. रेल्वे स्थानकावर असणार्‍या कँटीनमालकांना र्मयादित विक्रेते ठेवण्याचे बंधन आहे व त्यांनाच परवाने देण्यात आले आहेत. मात्र, अनेक कँटीनधारक र्मयादेपेक्षा अधिक विक्रेते ठेवत आहेत. याशिवाय बाहेरचेही अनेक विक्रेते सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन रेल्वेगाडयांमध्ये विक्री करत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.अनेक रेल्वे- स्थानकांच्या शेजारी बेकायदा टपर्‍या टाकून तेथे तयार केलेला चहा व खाद्यपदार्थ रेल्वेगाडयामध्ये विकण्यात येत आहे. गर्दीच्या हंगामात प्रवाशांना धक्का देत हे विक्रेते ट्रेनमध्ये फिरतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा प्रवाशांना खाद्यपदार्थामधून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचे प्रकारही घडले आहेत. याकडे रेल्वेची यंत्रणा डोळेझाक करत असल्याचे वास्तव ह्यलोकमतनेह्ण केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण मधून उघडकीस आले.असे झाले स्टिंग ऑपरेशनलोकमतचे दोन प्रतिनिधी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३0 वाजता वाशिम रेल्वे स्थानकावर पोहचले. यावेळी अकोल्याकडे जाणारी पॅसेंजर गाडी व हैद्राबादला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस या दोन गाड्यांचे क्रॉसिंग होते. पॅसेंजर गाडी एक्सप्रेसची वाट बघत तब्बल अर्धा तास रेल्वे स्थानकावर उभी होती. यावेळी विक्रे त्यांचे छायाचित्र आमच्या प्रतिनिधींनी टिपले. इंटरसिटी १0:३0 वाजता वाशिम रेल्वे स्थानकावर पोहचली. यावेळी पॅसेंजर मधील विक्रेते बेधडक इंटरसिटी एक्स प्रेसमध्ये शिरले. आमच्या प्रतिनिधींनी वाशिम ते हिंगोली असा रेल्वे प्रवास करून संपुर्ण रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षीततेबाबत शहानिशा केली. यावेळी दोन्हीही रेल्वेमध्ये तपासणी केली असता एकही रेल्वे पोलिस कर्मचारी व तिकिट तपासणीस फिरताना आढळून आला नाही. *पदार्थ विक्रीचा परवाना केवळ खिडकीतूनचरेल्वे प्रशासनाने ज्या विक्रेत्यांना व्यवसायाची परवानगी दिली आहे, त्यांना रेल्वेगाडयांच्या खिडक्यांमधून आपली सेवा देण्याचे बंधन आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे रेल्वेगाडयामध्ये शिरून पदार्थ विकण्याचा परवाना दिलेला नाही. मात्र, या नियमाला डावलून बेकायदा विक्रेते रेल्वेत गर्दी करतात.*रेल्वे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष गेल्या आठ दिवसापुर्वी अकोला - पुर्णा पॅसेंजरमध्ये दरोडा टाकून १0 ते १५ प्रवाशांना जबर मारहाण करून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरट्यांनी लुटली हो ती. यामुळे केवळ रेल्वे सुरक्षा बलच नव्हे, तर संपूर्ण मध्य रेल्वेमध्ये खळबळ उडाली होती. आरपीएफच्या इज्जतीचे वाभाडे निघाले. किमान यानंतर तरी दक्षता घेणे अपेक्षित होते. केवळ रेल्वे स्थानकच नव्हे, सर्वसाधारण डब्यापासून ते आरक्षित, वातानुकूलित डब्यामध्ये मुक्तपणे वावरणारे अनाधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते, गुटख्याची उघडपणे होणारी विक्रीवर या एका मोठय़ा घटनेनंतर परिणाम होईल अशी प्रवाशांना अपेक्षा होती. मात्र, रेल्वे पोलिसांनी ह्ययहॉ सब कुछ ऑलवेल हैह्ण असा पवित्रा घे तल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षततेवर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.*विक्रेत्यांच्या आरडाओरडीने प्रवासी त्रस्तरेल्वेमध्ये विनातिकीट घुसून तंबाखूजन्य, ज्वलनशील व खाद्यपदार्थाची विक्री करण्याचा गोरखधंदा आता नि त्याचाच झाला आहे. या विक्रेत्यांकडून होणारी आरडाओरड प्रवाशांना दिवसेंदिवस त्रासदायक ठरत आहे. थेट आरक्षण डब्यातही हे विक्रेते प्रवेश करता त.याचा नाहक त्रास सहन होत आहे.