शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नोटरीच्या माध्यमातून चारचाकी वाहनांची विक्री!

By admin | Updated: March 24, 2017 02:12 IST

वाहनांची परस्पर विक्री; बैतुल पोलिसांनी पकडलेल्या टोळीत अकोल्याचा युवक

अकोला, दि. २३- शहरातील खासगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांची शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर नोटरी करून विक्री केली जात आहे. नोटरी करून चारचाकी वाहनांची विक्री करणार्‍या एका टोळीला बैतुल (मध्य प्रदेश) पोलिसांनी अटक केली. या टोळीत अकोल्यातील एक युवक आहे. चारचाकी वाहनांची विक्री होत असल्याबाबत रामदासपेठ पोलिसांकडे काही दिवसांपूर्वीच एकाने तक्रार केली होती; परंतु पोलिसांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात जिल्हा याचिका करण्यात आली आहे. खासगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून वाहनांची खरेदी करण्यात येते. त्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करण्यात येते. नंतर कर्ज फेडण्यासाठी टप्पे पाडून दिले जातात. शहरात चारचाकी वाहन घेण्यासाठी चोलामंडलम फायनान्स कंपनीकडून अनेकांना कर्ज पुरवठा करण्यात आला. कर्जदारांनी कर्ज न भरताच, त्यांच्याकडील २६ चारचाकी वाहनांची परस्पर विक्री करण्यात आली असून, कर्जाच्या वसुलीसाठी कंपनीने जिल्हा न्यायालयात कलम १३८ नुसार याचिका दाखल केली आहे. चारचाकी वाहन मालकांनी काही अडचणींमुळे नोटरी करून दुसर्‍यांना वाहनांची विक्री केली. कंपनीला कोणतीही माहिती न देता, त्यांनी परस्पर वाहनांची विक्री केल्याचे कंपनीला कळले. नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर कर्जाचा उल्लेख आहे. त्यामध्ये फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणारा व्यक्ती तक्रार केल्यानंतर त्यातून बाहेर पडू शकतो. महागड्या किमतीचे वाहन दोन ते तीन लाख रुपयांमध्ये खरेदी करून ५0 हजार रुपयांमध्ये वाहनाची बनावट कागदपत्रे तयार केली जातात. असेच एक प्रकरण रामदासपेठ पोलीस ठाण्यात मंगेश मोहोड यांनी दाखल केले होते; परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीमध्ये अनेक लोकांनी नोटरी करून वाहने विकल्याचे म्हटले आहे. बैतुल पोलिसांनी पकडलेल्या टोळीत अकोल्यातील आरोपीचा समावेश असल्याने, अकोल्यातसुद्धा नोटरी करून चारचाकी वाहन विक्रीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे सिद्ध होत आहे. अशी माहिती कंपनीचे मोहन कारले आणि अँड. आशिष देशमुख यांनी दिली.