शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लेखा आक्षेपासाठी थांबवले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:32 IST

लेखा आक्षेप निकाली न काढणाºया अधिकारी-कर्मचाºयांचे वेतनच रोखल्याचा प्रकार वित्त विभागाकडून घडत आहे.

अकोला : जिल्हा परिषदेतील प्रलंबित लेखा आक्षेप निकाली काढण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर कामाला लावले. त्यावेळी संबंधितांच्या रजा मंजुरीचे अधिकारही मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना देण्यात आले. त्यानंतर आता लेखा आक्षेप निकाली न काढणाºया अधिकारी-कर्मचाºयांचे वेतनच रोखल्याचा प्रकार वित्त विभागाकडून घडत आहे.जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या लेखा परीक्षणात स्थानिक निधी लेखाचे २,२१७ आक्षेप प्रलंबित आहेत. त्यात गुंतलेली कोट्यवधींची रक्कम वसूल करणे तसेच आक्षेप निकाली काढण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सुटीच्या दिवशीही काम सुरू ठेवण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास कामे, योजना तसेच प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त निधी खर्चाचे परीक्षण केले जाते. माहिती न दिल्याने लेखा आक्षेप नोंदवले जातात. त्यामुळे निधी खर्चात अपहाराची शक्यताही आहे. त्या आक्षेपांचा निपटारा केल्यास खर्च झालेल्या निधीची सार्थकता स्पष्ट होते; मात्र काही प्रकरणात पुरावेच नसल्याने आक्षेप प्रलंबित आहेत. अपहाराला जबाबदार असलेल्या काही अधिकारी-कर्मचाºयांकडून रक्कम वसुलीसाठी टाळाटाळही केली जाते. दरम्यान, आक्षेप निकाली काढण्याच्या कालावधीत कर्मचाºयांच्या रजा मंजुरीचे अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना देण्यात आले. त्यानंतरही लेखा आक्षेप प्रलंबित आहेत.

- जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे थांबले वेतनलघुसिंचन विभागातील कर्मचाºयांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयात थांबवले आहे. लेखा आक्षेप निकाली न काढल्याने वेतन थांबवण्यात आल्याचे संबंधित कर्मचाºयांनी सांगितले आहे. २५ वर्षापूर्वींचे आक्षेप निकाली काढण्यासाठी कर्मचाºयांना जबाबदार धरून वेतन थांबवल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत.

- अपहारातील ७० टक्के रक्कम सामान्य फंडाचीलेखा परीक्षण अहवालात जिल्ह्यातील सामान्य फंड, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनांचा समावेश आहे. त्या प्रकरणात एकूण ४ कोटी ३९ लाख ८६ हजार २९८ रुपयांचा अपहार झाला आहे. सामान्य फंडातून अपहार झाल्याचे ३७४ प्रकरणे असून, त्यामध्ये ३ कोटी ११ लाख ५,७४३ रुपयांवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी अनेक आक्षेप निकाली निघालेले नाहीत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद