शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लावणीच्या तालावर सख्यांनी धरला फेर

By admin | Updated: December 31, 2014 00:49 IST

लोकमत सखी मंचचे आयोजन : अर्चना सावंत यांच्या लावणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

अकोला : लावणीचा ठसका, बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि व्यासपीठावर चैतन्य निर्माण करणार्‍या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजनाची सीमाच गाठली. महाराष्ट्राची लाडकी लावणीसम्राज्ञी तथा सिनेकलाकार अर्चना सावंत यांनी लोकमत सखी मंचच्या रंगमंचावर आपल्या अदाकारीने शेकडो सखींना मंत्रमुग्ध केले. शिट्या, टाळ्यांच्या उत्साहात या अप्सरेच्या ठेक्यावर सखीही थिरकल्या.लोकमत सखी मंच प्रस्तुत ह्यअप्सरा आलीह्ण हा लावणीचा कार्यक्रम ३0 डिसेंबर रोजी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रंगमहालातील लावणीला घराघरांत प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेल्या अर्चना सावंत यांच्या अस्सल लावणीचा बाज पाहण्यासाठी सखींनी दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. अर्चना सावंत यांच्या मंचावरील आगमनासाठी आतुर झालेल्या सखींनी एकच जल्लोष करीत त्यांचे स्वागत केले. आरंभी सखी मंच विभागप्रमुखांच्या हस्ते ङ्म्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्येष्ठ विभागप्रमुख रजनी राजगुरू यांचे स्वागत इव्हेंट हेड प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी राजगुरु यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर अप्सर एकापाठोपाठ मंचावर अवतरल्या आणि त्यांनी एकापेक्षा एक सरस लावण्यांचे सादरीकरण केले. 'या रावजी, बसा भावजी' ही बैठकीतील लावणी सादर करून आपल्या मुद्राभिनयाने सावंत यांनी सख्यांचे मन जिंकले. श्रुंगारिक लावणीतील साधेपणा दाखवित 'बाई मी लाडाची गं लाडाची.', 'आता वाजले की बारा.', 'कुण्या गावाचं आलं पाखरु.', 'कारभारी दमानं' अशा एकापेक्षा एक सरस गीतांवर मराठमोळी नखरेल अदाकारी सादर करुन अर्चनाने सभागृहातील तरुणींपासून ते वृद्ध सख्यांनाही थिरकण्यास भाग पाडले.