शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार केंद्रात सात-बाराचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 10:53 IST

आपले सरकार सेवा केंद्र चालक गैरवापर करीत असल्याची तक्रार महसूल व वन विभागानेच माहिती तंत्रज्ञान विभागाकडे केली.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिकांना विनाशुल्क फक्त पाहण्यासाठी भूलेख, महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध सात-बारा, आठ-अ च्या प्रती काढून संबंधितांकडून रक्कम उकळण्यासाठी त्या प्रमाणित करण्याचा गोरखधंदा आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी सुरू केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच यापुढे केंद्र चालकांनी सात-बारा सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून दिल्याचे आढळल्यास केंद्र चालकांवर गंभीर कारवाई करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिले आहेत.आपले सरकार सेवा केंद्रामार्फत भूलेख संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी सात-बारा व आठ-अ उपलब्ध करण्यात आला. त्या सुविधेचा आपले सरकार सेवा केंद्र चालक गैरवापर करीत असल्याची तक्रार महसूल व वन विभागानेच माहिती तंत्रज्ञान विभागाकडे केली. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिले आहेत.भूलेख, महाभूमी संकेतस्थळावर सात-बारा, आठ-अ उपलब्ध आहेत. आपले सरकार सेवा केंद्र चालक त्याच्या प्रती काढतात. त्यावर ‘फॉर व्ह्यू ओनली’ असे छापूनही येते. ज्या प्रतीवर असा वॉटरमार्क असेल ती फक्त माहितीसाठी आहे. त्याचा कोणत्याही प्रशासकीय, कायदेशीर कामासाठी वापर करता येत नाही. तरीही आपले सरकार सेवा केंद्र चालक या प्रतींवर सत्यतेची पडताळणी केल्याबाबत सही व शिक्का मारतात. हा प्रकार गंभीर आहे. या नकलांचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे केंद्र चालकांनी फक्त माहितीसाठी असलेल्या सात-बारा, ‘आठ-अ’वर सही व शिक्का मारून नागरिकांना देऊ नये, हा प्रकार आढळून आल्यास संबंधित तहसीलदार यांनी चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी दोषीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र चालकांवर कारवाई करावी, असेही बजावण्यात आले. याबाबतच्या तक्रारींवर जिल्हाधिकाºयांनी दर तीन महिन्यांनी आढावा घेत कारवाईचे अनुपालनही मागविण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग