शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

ग्रामविकासाच्या योजना कागदावरच

By admin | Updated: August 21, 2014 00:39 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा ग्रामीण भागात बोजवारा वाजत असल्याचे चित्र दिसत आहे.

बाभूळगाव: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २00८ पासून सुरू करण्यात आली असली, तरी या योजनेचा ग्रामीण भागात बोजवारा वाजत असल्याचे चित्र दिसत आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत मजुरांना मागणीनुसार काम उपलब्ध करू न देण्यात येते. ही योजना अधिक गतिमान व्हावी म्हणून, रोहयो मंत्री नितीन राऊत व राज्यमंत्री सुरेश धस यांनी परिपत्रक काढून रोहयोचे माहितीपत्रक ग्रामसभेत वाचून दाखविण्याचे आदेश दिले होते. मात्र, अकोला पंचायत समितीसह सातही तालुक्यातील अनेक गावांच्या ग्रामसभा उपस्थितीअभावी तहकूब झाल्याने या पत्रकाचे वाचन करण्यात आले नाही. ग्रामवासीयांच्या उदासीन धोरणामुळे शासनाच्या काही योजना कागदावरच असल्याचे यावरू न दिसत आहे. शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेंतर्गत अनेक कामे सुचविली आहेत. यामध्ये गुरासाठी चारा, शेततळे, समतल पातळी चर, समतळ पातळी बांध, दगडी बांध, शेत बांध-बंदीस्त, गैबियन बंधारा, भूमिगत बंधारा, माती नाला बांध, गांढूळ खत निर्मितीसाठी खड्डा, नाडेपखत निर्मितीसाठी खड्डा, कुक्कुट पालन शेड, शेळ्य़ासाठी गोठा, कॅरल शेड, शोषखड्डा, पुनर्भरण खड्डा, पांदण रस्ते, सिंचन विहीर, राजीव गांधी सेवा केंद्र, बांधावरील वृक्ष लागवड, बिहार पॅटर्न झाडाचे संगोपन व संरक्षण इत्यादी कामांचा समावेश आहे. ही कामे गावागावांत सुरू व्हावी व रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ग्रामसभेत वाचन होणे अत्यंत गरजेचे होते; परंतु गावात एकी नसल्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामसभा झाल्याच नाहीत. त्यामुळे मंत्रीमहोदयांचे हे पत्र फाईलच्या बाहेर आलेच नाही. ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शविली असती; तर या पत्रकाचा फायदा गावकर्‍यांनाच झाला असता, हे विशेष. ग्रामसभेला गावकर्‍यांनी उपस्थित राहावे, याबाबत सूचना फलकावर व दवंडीद्वारे माहिती देण्यात येते. असे असले तरी गावकरी अनुपस्थित राहत असल्याने माहिती ग्रामस्थापर्यंत पोहचत नाही. याचा परिणाम विकास कामांवर होतो. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.