शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात निवडणूक रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:26 IST

बोरगाव मंजू (अकोला) : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचायतीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून सरपंचाची निवड थेट मतदानाद्वारे करण्यात येत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

ठळक मुद्देप्रशासन सज्जबोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील २0 गावात होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू (अकोला) : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचायतीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून सरपंचाची निवड थेट मतदानाद्वारे करण्यात येत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.बोरगाव मंजू परिसरातील २0 ग्राम पंचायतींच्या सरपंच व सदस्य पदांकरिता  ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या २0 गावातील मतदार प्रथमच सरपंचांना मतदान करून थेट निवडून देणार आहेत. या पृष्ठभूमीवर सध्या या सर्व गावांमधील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान प्रत्येक उमेदवार आपल्याच हातात सत्ता येईल व आपणच निवडून येणार, अशा थाटात असून, त्यांचे कार्यकर्ते त्यांचे उमेदवारच निवडून येणार असल्याचे दावे व मतांची आकडेमोड करून मतदारांना सांगत आहेत. यामुळे अशा चर्चा सध्या पानवठय़ावर व सर्वत्र होत असल्याने सर्वसामान्य जनतेतही चर्चांना उधाण आले आहे. बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द एकूण २0 गावात मतदान केंद्रावर मतदान होईल. यामध्ये वाशिंबा, मासा, सुकळी नदापूर, वणी रंभापूर, अन्वी, निपाणा, मारोडी, सिसा, अंबिकापूर, बिरसिंगपूर, रामगाव, मिर्झापूर, खडका, कट्यार, सोनाळा, कोठारी, कौलखेड, वरोडी, देवळी, मारोडी आदी गावांचा समावेश आहे. या २0 गावातील सरपंच व सदस्य पदाकरिता निवडणूक होत असून, उमेदवार त्यांचे भाग्य आजमावत आहेत. तथापि, गाव विकासासाठी जनता कुणाच्या गळ्यात माळ घालेल, हे चित्र निवडणूक निर्णय झाल्यावरच समोर येईल, एवढे मात्र निश्‍चित.