शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तेल्हारा तालुक्यातून रूपाली खारोडे मताधिक्क्याने विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST

तेल्हारा : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तेल्हारा तालुक्यात शेतकरी पॅनलच्या रूपाली संदीप खारोडे यांचा विजय झाला ...

तेल्हारा : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तेल्हारा तालुक्यात शेतकरी पॅनलच्या रूपाली संदीप खारोडे यांचा विजय झाला असून, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी सहकार पॅनलचे नारायण मोहोड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. खारोडे यांना २४ तर मोहोड यांना ११ मते मिळाली. त्यामुळे सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा शेतकरी पॅनलने आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.

तेल्हारा तालुक्यातील सहकार क्षेत्रात काही दिवसांपासून तालुक्‍यातील दोन सहकार गट सक्रिय झाल्याचे दिसून आले होते. यामध्ये शेतकरी पॅनलमध्ये फूट आणि शेतकरी सहकार पॅनलची युती त्यामुळे शेतकरी पॅनल हे निश्चित कुणाचे याबद्दल अनेक चर्चा झाल्या होत्या. या सर्व घडामोडी झाल्यानंतर पहिली निवडणूक अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ठरली. यात शेतकरी पॅनलचे संदीप रमेशराव खारोडे यांच्या नेतृत्वात रूपाली खारोडे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पुन्हा उमेदवारी जाहीर केली. निवडणुकीत त्यांनी शेतकरी सहकार पॅनलचे नारायणराव मोहोड यांचा मोठ्या फरकाने पराभव करून पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्या विराजमान झाल्या. या निवडणुकीदरम्यान शेवटच्या तीन-चार दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. या घडामोडींमधून कोण विजयी होणार, याबाबत अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. रूपाली खारोडे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी अकोला व तेल्हारा येथे आनंदाेत्सव साजरा केला.