शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बिलकीस बानो प्रकरण 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालवा! वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी

By संतोष येलकर | Updated: September 29, 2022 17:01 IST

Akola News: गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी शीघ्रगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात)  चालवून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले

- संतोष येलकर अकोला - गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी शीघ्रगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात)  चालवून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले असून,  १ हजार १०० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे पाठविण्यात आले.

गुजरात मध्ये २००२ मधील हिंसाचाराच्या घटनेत  बिलकीस बानो यांच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली.या प्रकरणात ११ आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा झाली;मात्र यासंदर्भात गुजरात सरकारने एक समिती गठीत करून आरोपींना मुक्त करण्यात आले. त्यामुळे बिलकीस बानो प्रकरणात दाखल  दाखल याचिकेवर 'फास्ट ट्रॅक कोर्टात' सुनावणी चालवून बिलकीस बानो यांना तातडीने न्याय देण्यात यावा,अशी मागणी करीत, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये घेण्यात आलेल्या १ हजार १०० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे पाठविण्यात आले. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा  भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, जिल्हा परिषद सदस्य नीता गवई, संगीता  अढाऊ, मीना बावणे, मंदा वाकोडे, विजया गोपणारायन,पक्षाचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर  सुलताने आदी उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोला