शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

अकोल्यातील नवोदय विद्यालयात रॅगिंग

By admin | Updated: February 28, 2017 01:53 IST

पोलिसात तक्रार; इमारतीवरून फेकल्याने विद्यार्थ्याचा पाय मोडल्याचा आरोप

अकोला, दि. २७- बाभूळगाव जहाँ. येथील जवाहर नवोदय विद्यालयात बारावीच्या एका विद्यार्थ्याने आठवीच्या विद्यार्थ्याचे सतत एक वर्ष रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रॅगिंग होत असल्याची तक्रार प्राचार्यांंकडे केल्यामुळे, या विद्यार्थ्याला विद्यालयाच्या इमारतीवरून फेकण्यात आले. त्यामुळे त्याच्या पायाचे हाड मोडल्याचा आरोप पालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.बोरगाव मंजू येथील दिनेश गोपाळराव खंडारे यांचा मुलगा अमन नवोदय विद्यालयात आठवीत शिकतो. त्याला बारावीत शिकणारा अक्षय जाधव वर्षभरापासून त्रास देत आहे. त्याच्याकडून कपडे धुण्यापासून, तर गृहपाठ लिहून घेण्यापर्यंंतची कामे जाधव करून घेत होता. तसेच अमनच्या खोलीमध्ये येऊन काठीने मारहाण करायचा. अमनने याची तक्रार प्राचार्य बैलमारे, विद्यालयातील सर्व वरिष्ठांकडे केली; परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात न आल्याचा आरोप खंडारे यांनी फिर्यादीत केला आहे. प्राचार्यांंकडे तक्रार केल्याने २२ फेब्रुवारीच्या रात्री ८.१५ वाजता शाळेच्या छतावरून अक्षयने अमनला लोटून दिले. शिक्षकांनी त्याला सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायाचे हाड मोडले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असेही खंडारे यांनी म्हटले आहे. अमन खंडारे हा विद्यालयाच्या बाल्कनीमधून पाय घसरल्याने पडला. त्याने ही बाब चौकशीमध्ये स्वत: सांगितली आहे. तसेच त्याने त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल कधीही तक्रार दिलेली नाही.-डी. एस. थूल, उपप्राचार्य.