पातूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीसाठी दीड महिन्यापूर्वी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामधील भंडारज खुर्द, नांदखेड, वाहाळा बु, पाडसिंगी, बेलुरा खुर्द, बोडखा, पिंपळडोळी, अंबाशी, चान्नी, आसोला, पास्टुल, पांढुर्णा अनुसूचित जातीसाठी तर दिग्रस खुर्द देऊळगाव, आलेगाव, शिर्ला, सस्ती, चरणगाव, विवरा,चतारी ही गावे अनुसूचित जमातीसाठी सोडत काढून आरक्षित करण्यात आली होती. तालुक्यातील सस्ती, आलेगाव, दिग्रस बु, दिग्रस खुर्द, बेलूरा खु, तांदळी बु, बेलूरा बु. पाष्टुल, विवरा,चतारी, उमरा, राहेर, शिर्ला, मलकापूर, देऊळगाव, चान्नी, खानापूर, भंडारज खुर्द, चरणगांव, मळसूर, सायवणी, पिंपळखुटा, चांगेफळ या गावांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. येथील सरपंच पदाचे उमेदवार तथा ग्रामपंचायतीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. सरपंच पदासाठी गटांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सरपंच पदाकरिता कुणाची लॉटरी लागेल हे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होईल. तालुक्यातील सर्वात मोठ्या शिर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकमेव निवडून आलेल्या अर्चना सुधाकर शिंदे विराजमान होणार आहेत. त्यामुळे येथे उपसरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी रस्सीखेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST