शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोहणखेड परिसरात पेरणीचे नियोजन बदलणार!

By admin | Updated: July 3, 2017 01:32 IST

रोहणखेड : मृग नक्षत्रातच पाऊस रुसल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज असून, त्यांना आता केवळ पावसाचीच प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करोहणखेड : मृग नक्षत्रातच पाऊस रुसल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज असून, त्यांना आता केवळ पावसाचीच प्रतीक्षा आहे.गत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे जोमात सुरू केली होती. सध्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाळ्याला वेळेवर सुरुवात होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीला सुरुवात केली होती. मात्र मृग नक्षत्रात सुरुवातीनंतरही पावसाचे वातावरण दिसत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी खते, बी-बियाण्यांची खरेदी थांबवली. त्यामुळे शहरातील कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी ओसरली आहे. मृगाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील पेरण्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. मागीलवर्षी मृग नक्षत्रातच पाऊस पडल्याने पेरण्या लवकर आटोपल्या होत्या. यावेळी मात्र जून महिना पूर्ण आटोपला असून, पाऊस पडला नसल्याने पेरण्या कधी होतील, हे आताच ठामपणे सांगणे कठीण आहे. मूग, उडिदाच्या पेरणीचा कालावधी जात असल्याने शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळतील, असा अदांज आहे. पेरण्या लांबत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा लहरीपणा असाच राहिला, तर उत्पादन खर्चही निघते की नाही, याची शाश्वती नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस लांबल्याने पेरण्या ठप्प आहेत. त्याप्रमाणेच तालुक्यात पाणी व चारा टंचाईच्या तीव्रतेने डोके वर काढले आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागलेली पायपीट अजूनही सुरूच आहे. नदी-नाले तसेच विहिरी तलाव कोरडे पडले आहेत, तर कुठे पाणी साठा असूनही नियोजनशून्य कार्य पद्धतीमुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे. जनावरांचा चारा संपण्याच्या मार्गावर आहे. पावसाच्या आगमनावर छत्री, रेनकोट विक्रेते याचा व्यवसाय अवलंबून असतो. पाऊस लांबल्याने व्यापार मंदावला आहे. पाऊस नसल्याने पुढील सर्व प्रक्रिया मंदावल्या आहेत. नागरिक हात आखडून पैसा खर्च करीत आहेत. पेरणीला सुरुवात झाली असती, तर शेतमजुरांना रोजगार मिळाला असता.