शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अकोला शहरातील महावितरणच्या ‘एटीपी’ केंद्रावर दरोडा; साडेपाच लाखांची रक्कम लंपास; तीन आरोपी गजाआड 

By atul.jaiswal | Updated: December 22, 2017 17:35 IST

अकोला : अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित महावितरणच्या वीज बिल केंद्रावर (एटीपी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा घालून ५ लाख ६० हजार २४० रुपयांची लंपास केली. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी रामदास पेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्दे या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार संतोष राजाराम भटकर हा असून, तो इलेक्ट्रीशियनचे काम करतो. सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे(४५) यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.तिघा जणांच्या पहाटे मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. 

अकोला: महावितरणच्या दुर्गा चौकातील एटीपी(विद्युत बिल भरणा) केंद्रांवर दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रूपयांचे रोकड पळविण्याची घटना गुरूवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. दरोडखोरांना रोकड नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे(४५) यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दरोडा घालणाºया तिघा जणांच्या पहाटे मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली. विद्युत भवनाच्या मागील परिसरात वीज बिल भरणा केंद्र आहे. या केंद्रात गुरुवारी दिवसभरात नागरिकांनी भरलेल्या वीज बिलाची ५ लाख ६० हजार २४० रुपयांची रक्कम गोळा झाली. ग्राहकांनी भरलेली रक्कम रात्रभर याठिकाणीच ठेवण्यात येते. याची माहिती दरोडेखोरांना असल्याने, त्यांनी गुरूवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास एटीपी केंद्राचे पत्र्याचे छत तोडून आत प्रवेश केला. यावेळी याठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी लाळे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या चेहºयावर व दोन्ही पायावर धारदार हत्याराने वार करून जखमी केले आणि एटीपी केंद्रातील मशीन फोडून, त्यामध्ये गोळा झालेली ५ लाख ६० हजार २४० रुपयांची रक्कम घेऊन दरोडखोर पसार झाले. या घटनेची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने गतीने तपास करून शहरातील देशमुख फैल, लक्कडगंज परिसरात दडून बसलेले दरोडखोर संतोष राजाराम भटकर(३२), वसंत नारायण महाजन आणि कालु मेहमुद खान यांना अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यातील ५ लाख ६0 हजार रूपयांपैकी २५ हजार रूपयांची रोकड जप्त केली. अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होते. रामदासपेठ पोलिसांनी भांदवि कलम ३९४(३४), २0१ नुसार गुन्हा दाखल केला.

सीसी कॅमेरा बंद करून लुटली रोकडदरोडेखोरांनी एटीपी केंद्राचे पत्र्याचे छत तोडून आत प्रवेश केला आणि दरोडा घालण्यापूर्वी एटीपी केंद्रातील सीसी कॅमेºयाची केबल वायर कापली आणि रोकड लुटून नेली. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार संतोष राजाराम भटकर हा असून, तो इलेक्ट्रीशियनचे काम करतो. 

क्राईम कंट्रोलमध्येच: कलासागरशहरातील होणाºया हत्या, लूटमार, चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांवर पत्रकारांनी चिंता व्यक्त करीत, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना, पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटले का? असा प्रश्न विचारला. त्यावर कलासागर यांनी, हत्याकांडातील सर्वच आरोपी अटक झाले असून, क्राईम कंट्रोलमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. लवकरच प्रमुख मार्गंवर सीसी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण