अकोला: मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे मालधक्क्याहून रामदासपेठकडे जाणार्या युवकाला तिघा जणांनी अडवून त्याला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम हिसकावली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री २ वाजता गुन्हा दाखल केला. करतवाडी येथील गणेश भानुदास भालेराव (२९) हा रेल्वे मालधक्क्याकडून रामदासपेठकडे जात असताना, रात्री १.१५ वाजताच्या सुमारास त्याला आकोट फैलातील योगेश राजेश येळपल्ले, सचिन नारायण कांबळे, अतुल हरिदास उईके यांनी अडविले आणि गणेशला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख ८५0 रुपये हिसकावून घेतले. गणेश भालेरावने दिलेल्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध कलम ३९२(३४) नुसार गुन्हा दाखल केला.
युवकाला मारहाण करून लुटले
By admin | Updated: July 10, 2015 01:28 IST