अकोट : प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली सैन्य दलातील आस्तिक प्रकाश अंभोरे या शिपायाविरुद्ध अकोट ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली येथे आर्मीत कार्यरत असलेल्या आस्तिक अंभोरे हा देऊळगाव येथील रहिवासी आहे. त्याने अमरावती येथील एका १९ वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले, तसेच तिचे शारीरिक शोषण केले. लग्नाकरिता तगादा लावला असता भूलथापा देऊन त्याने लग्नास नकार दिला. अशा आशयाची फिर्याद अकोट ग्रामीण पोलिसांत देण्यात आली. त्यावरून आरोपीविरुद्ध भादंविच्या ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. २२ एप्रिल रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड, पो.काँ. नंदकिशोर कुलट करीत आहेत.
युवतीचे शोषण करणाºया जवानाला कोठडी
By admin | Updated: April 23, 2017 08:49 IST